कधी उशिरा, तर कधी चुकीची प्रश्नपत्रिका : शिवाजी विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:36 AM2018-05-27T00:36:56+5:302018-05-27T00:36:56+5:30

कधी उशिरा, तर कधी चुकीच्या विषयांची प्रश्नपत्रिका देण्याचा प्रकार हिवाळी आणि उन्हाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर परीक्षांदरम्यान घडला आहे.

 Whenever late, and sometimes wrong papers: Shivaji University | कधी उशिरा, तर कधी चुकीची प्रश्नपत्रिका : शिवाजी विद्यापीठ

कधी उशिरा, तर कधी चुकीची प्रश्नपत्रिका : शिवाजी विद्यापीठ

Next
ठळक मुद्देनावाजलेल्या परीक्षा मंडळाचा गोंधळ; विद्यार्थ्यांना होतोय नाहक त्रास

संतोष मिठारी ।
कोल्हापूर : कधी उशिरा, तर कधी चुकीच्या विषयांची प्रश्नपत्रिका देण्याचा प्रकार हिवाळी आणि उन्हाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर परीक्षांदरम्यान घडला आहे. त्यातून शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या कामकाजातील गोंधळ आणि अनागोंदी समोर आली आहे. त्याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना होत आहे.

परीक्षाविषयक कामकाजामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, सर्वाधिक परीक्षा घेऊनही वेळेत निकाल जाहीर करणे याबाबत शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ राज्यात आघाडीवर आहे. त्याच्या जोरावर मुंबई विद्यापीठाला उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात मदत करण्याची जबाबदारी या मंडळावर सोपविण्यात आली होती. अशा पद्धतीने नावाजलेल्या या परीक्षा मंडळाच्या कामकाजात मात्र, सध्या काही गोंधळ आणि अनागोंदी सुरू आहे.

आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१७ मधील (हिवाळी सत्र) आॅक्टोबरमध्ये बी. एस्सी. अभ्यासक्रमाच्या काही परीक्षार्थींना प्रवेशपत्रच मिळाले नाही.नोव्हेंबरमध्ये आॅनलाईन सांकेतिक क्रमांक समजण्यातील गोंधळामुळे एम. कॉम. भाग दोनचा पेपर परीक्षार्थींना अर्धा तास उशिरा मिळाला.

या प्रकाराच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या एम. कॉम. भाग दोनच्या पेपरवेळी पुन्हा असाच गोंधळ घडला. बी. टेक. अभ्यासक्रमाच्या पदवी प्रमाणपत्रातील चुका झाल्याचा प्रकार मार्च २०१८ मध्ये समोर आला. उन्हाळी सत्रातील परीक्षांदरम्यान बी. ए. हिंदी भाग एकच्या परीक्षार्थींना चुकीची प्रश्नपत्रिका मिळाली. यानंतर ‘एलएल. बी.’ अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष आणि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमातील तृतीय वर्षाच्या पुनर्परीक्षार्थींना बुधवारी (दि. २३) जुनेच प्रश्न असलेला पेपर मिळाला. परीक्षाविषयक या चुकांचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

कुलगुरूंनी लक्ष देण्याची गरज
प्रश्ननियोजकाकडून प्रश्नपत्रिका तयार करणे, ती गोपनीयतेसाठी पाकीटबंद करणे. त्यासह सिक्युअर्ड रिमोट पेपर डिलिव्हरी (एसआरपीडी, गोपनीय व नियंत्रित पद्धतीने प्रश्नपत्रिका वितरण) या प्रणालीद्वारे प्रश्नपत्रिकांचे वितरण आणि या टप्प्यांवर होणाºया चुकांचा समावेश आहे. निकाल वेळेत लावण्याच्या कामगिरीमुळे विद्यापीठाचा राज्यात नावलौकिक आहे. परीक्षा मंडळासह एकूण विद्यापीठातील उल्लेखनीय कामगिरीमुळे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरुपद सांभाळण्याची जबाबदारी मिळाली. परीक्षा मंडळाच्या कामकाजातील गोंधळ थांबविण्यासाठी कुलगुरूंनी वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे मत विद्यापीठातील विविध घटकांकडून व्यक्त होत आहे.

परीक्षांविषयक आकडेवारी दृष्टिक्षेपात
विद्यापीठाकडून दोन सत्रांत घेणाºया परीक्षांची संख्या
११६८
वर्षभरात परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांची संख्या
५ लाख ७५ हजार
एका सत्रात तपासल्या जाणाºया उत्तरपत्रिका
२२ लाख

Web Title:  Whenever late, and sometimes wrong papers: Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.