तृतीयपंथीयांसाठीचे कल्याणकारी मंडळ कागदावरच पायाभूत सर्वेक्षणच नाही : संख्येबाबतही राज्यभरात संभ्रमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:55 AM2018-06-17T00:55:04+5:302018-06-17T00:56:22+5:30

राज्य शासनाने तृतीयपंथीयांसाठी स्थापन केलेले कल्याणकारी मंडळ गेली दोन वर्षे कागदावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला म्हणून सरकारने स्थापना केली;

 The welfare board for the third party is not a fundamental survey on paper: | तृतीयपंथीयांसाठीचे कल्याणकारी मंडळ कागदावरच पायाभूत सर्वेक्षणच नाही : संख्येबाबतही राज्यभरात संभ्रमच

तृतीयपंथीयांसाठीचे कल्याणकारी मंडळ कागदावरच पायाभूत सर्वेक्षणच नाही : संख्येबाबतही राज्यभरात संभ्रमच

Next

विश्वास पाटील ।
कोल्हापूर : राज्य शासनाने तृतीयपंथीयांसाठी स्थापन केलेले कल्याणकारी मंडळ गेली दोन वर्षे कागदावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला म्हणून सरकारने स्थापना केली; परंतु पुढे त्याबाबत कोणतीच प्रक्रिया केलेली नाही. मुळात तृतीयपंथी म्हणायचे कुणाला व त्यांची नेमकी संख्या किती याबाबतही संभ्रम आहे. त्यासाठीच पायाभूत सर्वेक्षण होण्याची गरज आहे.

न्यायालयाने तृतीयपंथीयांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी लिंग या शब्दासमोर स्त्री-पुरुष व तृतीयपंथी असा पर्याय देऊन त्यांना इतर मागासवर्गीयांना ज्या सवलती मिळतात, त्या द्याव्यात, असा निर्णय जुलै २०१६ मध्ये दिला. राज्य शासनाने केलेल्या २०१४ च्या महिला धोरणातही कल्याणकारी मंडळाचा उल्लेख आहे. त्याचीच दखल घेऊन शासनाने कल्याणकारी मंडळाची घोषणा केली; परंतु ते मंडळ फक्त नावापुरतेच राहिले आहे.

त्यामुळे हे मंडळ नियुक्त करून त्यांना पुरेसे बजेट दिले जावेच; परंतु त्याचवेळी प्रश्नावलीच्या माध्यमातून त्यांचे सर्वेक्षण व्हावे, अशी मागणी देवदासी पुनर्वसन चळवळीतील कार्यकर्त्या डॉ. साधना झाडबुके यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तृतीयपंथीयांचे सोशल वर्कर व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जावे व त्यांना सामाजिक न्याय विभागातर्फे ओळखपत्र दिल्यास योजनांचा लाभ देणे सुलभ होऊ शकते.

एक दृष्टिक्षेप
स्त्रियांतील समलिंगींना ‘लेस्बियन’ म्हणून ओळख.
पुरुषांतील समलिंगींना
‘गे’ म्हणून ओळख.
पुरुष व महिलांबरोबरही लैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना ‘बी’ म्हणून ओळख.
शरीर पुरुषाचे; परंतु मानसिकता स्त्रीची किंवा त्याच्या उलटे असा व्यवहार करणाºयांना तृतीयपंथी म्हणून ओळखले जाते.

हिजडा ते ईमेल..
तृतीयपंथीयांना हिजडा, पावणेआठ, छक्का, देवडा, बंदे, किन्नर, अलक्या, पवय्या, खोजे, लुगडवाला, फातडा, देवमामा, देवमावशी, देवाची आई अशा नावांनी बोलविले जाते. अलीकडे त्यास ‘ईमेल’ म्हणूनही हिणवले जाते.

उपजीविकेची साधने
ज्यांना देवाला सोडलेले असते, ते धार्मिक विधी करून पोट भरतात.
टाळ्या वाजवून
भीक मागणे.
मूल जन्माला आल्यावर नाचत आशीर्वाद देऊन मिळणाºया पैशांतून.
वेश्याव्यवसाय करून जगणाºयांची संख्या
सर्वांत जास्त.

Web Title:  The welfare board for the third party is not a fundamental survey on paper:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.