हमिदवाडकरांना कारखान्यातून पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:10 AM2018-04-26T00:10:10+5:302018-04-26T00:10:10+5:30

Water supply from Hamidwadkar to the factory | हमिदवाडकरांना कारखान्यातून पाणीपुरवठा

हमिदवाडकरांना कारखान्यातून पाणीपुरवठा

Next


म्हाकवे : पिण्याच्या पाण्यासाठी हमिदवाडा (ता. कागल) येथील ग्रामस्थांची ऐन उन्हाळ्यातील पाचवीलाच पुजलेली वणवण लवकरच संपणार आहे.
गावकऱ्यांनी एकजूट दाखवत लोकवर्गणीतून सदाशिवराव मंडलिक कारखाना कार्यस्थळावरील हौदातून पाणी आणण्याचा निर्धार केला आहे. त्याला प्रा. संजय मंडलिक यांनी प्रतिसाद देत हौदापासून गावच्या टाकीपर्यंत पाईपलाईन खुदाईचे कामही कारखान्याच्यावतीने करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हमिदवाडा ग्रामस्थांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.
हमिदवाडा गावची पिण्याची पाणी योजना चिकोत्राऐवजी बारमाही वाहणाºया वेदगंगा नदीतून व्हावी, यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ही बाब न्यायप्रविष्ट आहे. चिकोत्रा नदीतून प्रत्येक महिन्यातील १० ते १२ दिवसच पाणीपुरवठा होतो. त्यामुळे गावकºयांना अन्य कालावधीत पाण्यासाठी वणवण करावी लागते. यातून सुटका करून घेण्यासाठी लोकवर्गणीतून ही योजना करण्यासाठी ग्रामस्थ सरसावले आहेत. यासाठी सरपंच सुमन विलास जाधव, उपसरपंच शिवाजी मोरबाळे, सदासाखरचे संचालक आनंदा मोरे, माजी सरपंच डी. डी. कोंडेकर यांच्यासह सर्व सदस्य व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
दरम्यान, हमिदवाडकरांसाठी धावून जात प्रा. मंडलिक यांनी कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाच्या संमतीने कारखाना कार्यस्थळावरील हौदापासून ते या गावच्या पाण्याच्या टाकीपर्यंत करण्यात येणाºया पाईपलाईनच्या खुदाईची जबाबदारीही स्वीकारली. तर लोकवर्गणीतून सहा इंची पीव्हीसी पाईपची खरेदी करून ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या कामाला गती मिळाली आहे.

लोकवर्गणीतूनच पाईपची खरेदी
गावच्या उत्तर बाजूला मंडलिक कारखान्याची पाणी योजना असून कारखान्याच्या वाहनतळावर सिमेंटचा हौद आहे. येथून गावच्या हमिदवाडा गावातील जलकुंभचे सुमारे दोन कि.मी. अंतर आहे. यासाठी जवळपास ३२० इतक्या ६ इंची पीव्हीसी पाईपची गरज आहे. यासाठी सरपंच सुमन जाधव यांनी २१ हजार, उपसरपंच शिवाजी मोरबाळे १५ हजार, डॉ. इनामदार यांनी २० हजार, शशिकांत सुळकु डे यांनी ११ हजार यासह अनेक ग्रामस्थांनी एका पाईपपासून अकरा पाईप देऊ केल्या आहेत.
लोकवर्गणीचाच पर्याय....
चिकोत्रा ऐवजी वेदगंगा नदीवरूनच हमिदवाडा येथे पिण्याच्या पाण्याची योजना व्हावी यासाठी जनहित याचिका न्यायालयात दाखल आहे. त्यामुळे ही याचिका निकालात निघाल्याशिवाय येथील पाणी योजनेवर कोणताही शासकीय निधी खर्च करता येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य घरोघरी जाऊन आपल्या आर्थिक सक्षमतेप्रमाणे लोकवर्गणी जमा करण्याचे आवाहन करीत आहेत. तर ग्रामस्थही एकसंध होत लोकवर्गणीतून येथील गंभीर पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढे आले आहेत.

Web Title: Water supply from Hamidwadkar to the factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.