‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’चा थरार सहा जानेवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 01:03 AM2018-12-10T01:03:45+5:302018-12-10T01:04:18+5:30

कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’चे दुसरे पर्व सुरू झाले आहे. यंदा ‘व्हिंटोजिनो प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ ...

'Venontozino' presented 'Lokmat Mahamarethon' thriller on January 6 | ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’चा थरार सहा जानेवारीला

‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’चा थरार सहा जानेवारीला

Next

कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’चे दुसरे पर्व सुरू झाले आहे. यंदा ‘व्हिंटोजिनो प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्डबाय माणिकचंद आॅक्सिरिच’चा थरार कोल्हापुरात ६ जानेवारी २०१९ ला पुन्हा एकदा रंगणार आहे. या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी धावपटूंसह नागरिकांमध्ये उत्कंठा निर्माण झाली आहे.
लोकप्रियतेच्या ‘माईल स्टोन’ ठरलेल्या या महामॅरेथॉनमध्ये आपला ठसा उमटविण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यांतील हजारो धावपटू गेल्या काही महिन्यांपासून पूर्वतयारी म्हणून मैदानांवर परिश्रम करीत आहेत. विशेष म्हणजे या महामॅरेथॉनमध्ये नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करण्यासाठी राज्यभरातील धावपटू, प्रतिष्ठित नागरिक, महिला व उदयोन्मुख खेळाडूंत अक्षरश: चढाओढ लागली आहे. गेल्या वर्षी क्रीडानगरी अर्थात कोल्हापुरात या महामॅरेथॉनला उदंड प्रतिसाद लाभला. यात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर झालेल्या या महामॅरेथॉनमध्ये धावपटूंनी नोंदविलेली वेळ अचूक मिळाली. त्यामुळे ‘लोकमत’ने वापरलेल्या तंत्रज्ञानाचीही चर्चा धावपटूंमध्ये दुसºया पर्वातही सुरू आहे.
यंदाची कोल्हापुरातील महामॅरेथॉनही संस्मरणीय ठरेल, असा विश्वास धावपटूंत आहे. तिची तयारी करणाºया धावपटूंनी शहरातील अनेक मैदाने, रस्ते अगदी पहाटेपासून फुलून गेलेली असतात. विशेषत: शिवाजी विद्यापीठ परिसर, रंकाळा तलाव, ताराबाई पार्क परिसर, टी. ए. बटालियनचा परिसर, पंचगंगा नदी परिसर, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग, राधानगरी मार्ग, गांधी मैदान, दुधाळी, शिवाजी स्टेडियम, कोल्हापूर-गगनबावडा, आदी ठिकाणी भल्या पहाटेपासून धावपटू कसून सराव करीत असल्याचे चित्र आहे. आबालवृद्ध तंदुरुस्त राहावेत या हेतूने आयोजित ही महामॅरेथॉन फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त, धावण्याचा छंद असणाºयांसाठी) १० कि.मी.ची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ कि.मी. (१८ पेक्षा जास्त) असणार आहे. त्यात फॅमिली रन ३ कि.मी. अंतराची असणार आहे. ती सर्वच वयोगटांसाठी खुली असणार आहे. त्याचप्रमाणे लष्कर, पोलीस दलातील धावपटूंसाठी वेगळा गट ठेवण्यात आला आहे. नकाशाच्या मेडलबाबत उत्सुकता
या मॅरेथॉनमधील १० आणि २१ किलोमीटरची स्पर्धा पूर्ण करणाºया प्रत्येक धावपटूला कोल्हापूरचा नकाशा असलेली पदके (मेडल्स) देण्यात येणार आहेत. नाशिक येथे झालेल्या मॅरेथॉनमधील धावपटूंना त्या-त्या शहराचा नकाशा असणारी मेडल्स दिली आहेत. धावपटूने नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर व पुणेमधील मॅरेथॉन पूर्ण करून मिळविलेली मेडल्स जुळविल्यास आपल्या ‘महाराष्ट्रा’चा नकाशा तयार होणार आहे. या पाच शहरांमधील मॅरेथॉन जिंकून ही मेडल्स पटकाविणारा धावपटू हा ‘महामॅरेथॉनर’ ठरणार आहे. त्यामुळे या पदकाबद्दल धावपटूंना वेगळे आकर्षण आहे. पदक म्हटले की ते गोलाकार असते. मग ते सोने, चांदी अथवा कांस्य असो. मात्र, ही परंपरा खंडित करीत ‘लोकमत’ने सर्वांना भावेल असे पदक धावपटूंना पहिल्या पर्वापासून देण्यास सुरुवात केली. धावपटूंनाही या मेडल्सचे मोठे अपु्रप वाटत आहे. यंदा नव्याने सहभागी होणाºया धावपटूंना हे मेडल म्हणजे आकर्षण बनून राहिले आहे.

नकाशाच्या मेडलबाबत उत्सुकता

अल्प शुल्कात बक्षिसांची लयलूट
प्रकार शुल्क अर्ली बर्ड शुल्क मिळणारे साहित्य
३ कि.मी. ४०० रु. ४०० रु. टी-शर्ट गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
५ कि.मी. ६०० रु. ४९० रु. टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
१० कि.मी. १२०० रु. ११०० रु. टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
२१ कि.मी १२०० रु. ११०० रु. टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
२१ कि.मी. १,००० रु. १,००० रु. टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट

एकूण सहा लाखांची बक्षिसे आणि बरेच काही
वयोगट वर्गवारी प्रथम द्वितीय तृतीय
१८ ते ४५ पुरुष (खुला) भारतीय २५,००० २०,००० १५,००० रु.
१८ ते ४० महिला (खुला) भारतीय २५,००० २०,००० १५,००० रु.
४५ वर्षांवरील पुरुष (प्रौढ) भारतीय २५,००० २०,००० १५,००० रु.
४० वर्षांवरील महिला (प्रौढ) भारतीय २५,००० २०,००० १५,००० रु.
१८ ते ४५ वर्षांवरील पुरुष (परदेशी खेळाडू) २०,००० १५,०००
१८ ते ४० वर्षांवरील महिला (परदेशी खेळाडू) २०,००० १५,०००

वयोगट वर्गवारी प्रथम द्वितीय तृतीय
१८ ते ४५ वयोगट पुरुष (खुला) भारतीय १५,००० १२,००० १०,०००
१८ ते ४० वयोगट महिला (खुला) भारतीय १५,००० १२,००० १०,०००
४५ वर्षांवरील पुरुष (प्रौढ गट) भारतीय १५,००० १२,००० १०,०००
४० वर्षांवरील महिला (प्रौढगट) भारतीय १५,००० १२,००० १०,०००
१८ ते ४५ वर्षांवरील पुरुष (परदेशी खेळाडू ) १५,००० १०,०००
१८ ते ४० वर्षांवरील महिला (परदेशी खेळाडू) १५,००० १०,०००

Web Title: 'Venontozino' presented 'Lokmat Mahamarethon' thriller on January 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.