आजºयात ३६ गावांत उपसरपंचासाठी चुरस, भादवणमध्ये महिलेला संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:34 AM2017-11-21T00:34:56+5:302017-11-21T00:36:31+5:30

आजरा : आजरा तालुक्यात २४ नोव्हेंबरला उपसरपंचपदाच्या निवडी होणार असून, गावच्या कारभारात उपसरपंचालाही महत्त्व

 Today, in 36 villages, there is a chance for women to excel, and a chance for women in Bhadavna | आजºयात ३६ गावांत उपसरपंचासाठी चुरस, भादवणमध्ये महिलेला संधी

आजºयात ३६ गावांत उपसरपंचासाठी चुरस, भादवणमध्ये महिलेला संधी

googlenewsNext
ठळक मुद्देअशिक्षित सरपंच असलेल्या गावांत उपसरपंचाला महत्त्वज्या गावात अशिक्षित महिला आहेत, त्या गावचा कारभार उपसरपंचालाच

आजरा : आजरा तालुक्यात २४ नोव्हेंबरला उपसरपंचपदाच्या निवडी होणार असून, गावच्या कारभारात उपसरपंचालाही महत्त्व असल्याने तालुक्यातील ३६ गावांत उपसरपंचपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. भादवणमध्ये महिलेला या पदावर संधी मिळणार आहे.
ज्या गावात अशिक्षित महिला आहेत, त्या गावचा कारभार उपसरपंचालाच हाताळावा लागणार आहे. त्याचबरोबर सरपंचानंतर उपसरपंचानाच सत्तेत स्थान राहणार असल्याने सत्ताधारी व विरोधी आघाडीतून उपसरपंचपदासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अनेक गावांत उपसरपंचपदासाठी इच्छुकांमधून कुरघोडीचे राजकारण सुरू आहे.
कोरीवडे, भादवण, उत्तूर, वझरे, मडिलगे, सरंबळेवाडी, लाकूडवाडी, हाजगोळी (खुर्द) या गावांत एकहाती सत्ता आली आहे, तर साळगाव, शेळप, होन्याळी, झुलपेवाडी, खेडे, खानापूर, वडकशिवाले या गावांत उपसरपंचपदासाठी रंगत येणार आहे.

चार टप्प्यांत निवड
शुक्रवार (दि. २४) : दाभिल, खानापूर, मासेवाडी, किटवडे, पेंढारवाडी, वझरे, वडकशिवाले, लाकूडवाडी, कोरिवडे, आवंडीवाडा.
रविवार (दि. २६) : लाटगाव, बहिरेवाडी, खेडे, पारपोली, साळगाव, सुळेरान, पोळगाव, भादवण, आरदाळ, सोहाळे, कोळिंद्रे, हाजगोळी बुद्रुक, हाजगोळी (खुर्द).
सोमवार (दि. २७) : मडिलगे, चितळे, उत्तूर, कोनोली, होन्याळी, भादवणवाडी, धामणे, गजरगाव, श्रुंगारवाडी, झुलपेवाडी, चाफवडे.
बुधवार (दि. २९) : शेळप, सरंबळवाडी.

Web Title:  Today, in 36 villages, there is a chance for women to excel, and a chance for women in Bhadavna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.