अतिदुर्गम भागातील मुला-मुलींची उद्यापासून तीन दिवसीय सहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 04:21 PM2019-01-24T16:21:10+5:302019-01-24T16:30:53+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर वस्त्यांसह अतिदुर्गम भागातील वाड्या वस्तींवरील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना नागरी जीवन, विविध आस्थापना आणि शहरांची ओळख, नवी ऊर्जा मिळावी. अशा विविध उद्देशाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिल रायडर्स अ‍ॅडव्हेंचर फौंडेशन व संवेदना सोशल फौंडेशनतर्फे उद्या, शुक्रवारी (दि. २५) ते रविवारी (दि. २७) दरम्यान सहल आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती राहुल चिकोडे व प्रमोद पाटील यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

Three-day trip from tomorrow to boys and girls in the remote areas | अतिदुर्गम भागातील मुला-मुलींची उद्यापासून तीन दिवसीय सहल

अतिदुर्गम भागातील मुला-मुलींची उद्यापासून तीन दिवसीय सहल

Next
ठळक मुद्देअतिदुर्गम भागातील मुला-मुलींची उद्यापासून तीन दिवसीय सहलहिल रायडर्स व संवेदना सोशल फौंडेशनचे आयोजन

कोल्हापूर : जिल्ह्यातील धनगर वस्त्यांसह अतिदुर्गम भागातील वाड्या वस्तींवरील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना नागरी जीवन, विविध आस्थापना आणि शहरांची ओळख, नवी ऊर्जा मिळावी. अशा विविध उद्देशाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिल रायडर्स अ‍ॅडव्हेंचर फौंडेशन व संवेदना सोशल फौंडेशनतर्फे उद्या, शुक्रवारी (दि. २५) ते रविवारी (दि. २७) दरम्यान सहल आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती राहुल चिकोडे व प्रमोद पाटील यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या सहलीत पाचवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना सहभागी करून घेण्यात आले आहे. दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना प्रशासकीय यंत्रणेमार्फत निर्देश पाठविण्यात आले आहेत. मागील वर्षीही अशा पद्धतीची सहल आयोजित करण्यात आली होती.

यंदा या उपक्रमात शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड या ६ तालुक्यांतून ३५ वाड्या-वस्त्यांवरील २०० मुले-मुली सहभागी होणार आहेत. यात दि. २५ ते २७ दरम्यान शिवाजी विद्यापीठ, भवानी मंडप, अंबाबाई मंदिर, टाऊन हॉल म्युझियम, न्यू पॅलेस म्युझियम, पोलीस मुख्यालय, शास्त्रीनगर, झेंडा गार्डन, शाहू साखर कारखाना, कणेरी मठ, गोकुळ दूध, पन्हाळा दर्शन, जेऊर येथील अ‍ॅडव्हेंचर पार्क, आदी ठिकाणांचे दर्शन व माहिती या मुलांना मार्गदर्शन देणार आहेत.

विशेष म्हणजे शाहू स्टेडियम येथे होणाऱ्या शासकीय ध्वजवंदन समारंभ व संचलन या कार्यक्रमात ही मुले पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. यात शिवतेज पाटील, वैभवी पाटील, श्रावणी पसारे, किमया लोणकर, ओंकार कारंडे हे सर्व या मुलांना माहिती देणार आहेत.

 

Web Title: Three-day trip from tomorrow to boys and girls in the remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.