ठाकरेंवरील टीका सहन करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:55 AM2017-12-11T00:55:37+5:302017-12-11T00:55:37+5:30

Thackeray's criticism will not tolerate | ठाकरेंवरील टीका सहन करणार नाही

ठाकरेंवरील टीका सहन करणार नाही

googlenewsNext


कोल्हापूर : दोनवेळा विधानसभेला पराभूत झालेल्या नारायण राणे यांना त्यांच्या राज्यात जनाधार राहिलेला नाही. त्यामुळेच केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठीच राणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाचे काम करावे. मात्र, यापुढे ठाकरेंवरील टीका शिवसेना सहन करणार नाही, असा इशारा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिला.
शुक्रवारी कोल्हापूरच्या सभेत राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दुधवडकर यांनी
रविवारी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार वैभव नाईक, दुर्गेश लिंग्रस उपस्थित होते.
दुधवडकर म्हणाले, राणे यांनी तिच-तिच कॅसेट वाजविण्यापेक्षा त्यांचे चरित्रच लिहून लोकांना वाटावे. १२ वर्षांपूर्वी त्यांचा आमचा संबंध संपला आहे. ‘मातोश्री’वरील टीका यापुढे शिवसैनिक सहन करणार नाहीत. तुम्ही नवा पक्ष काढला आहे. तुमच्या पक्षाची चांगली बांधणी करा, त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, शिवसेना आणि ठाकरेंवर तोंडसुख घेण्याचे कारण नाही.
सर्व प्रचार मोहिमा कोकणातून सुरू करणाºया राणेंना कोल्हापुरात येण्याची गरज का पडावी, असा सवाल उपस्थित करून त्यांनी विनय कोरे, महादेव जानकर यांच्या पक्षाची काय अवस्था आहे ती पाहावी, असा सल्लाही यावेळी दिला.
काँग्रेसमध्ये असताना सोनियांचे पाय यांना सोन्याचे दिसले. आता यांना मुख्यमंत्री आदरणीय वाटायला लागलेत. आम्ही त्यांना विरोध केला नाही. त्यांना मंत्री करणार की संत्री हे त्यांनीच त्यांना ज्यांनी ‘शब्द’ दिलाय त्यांना विचारावं, असा टोलाही दुधवडकर यांनी यावेळी राणे यांना लगावला.
सभेला सुरेश साळोखेसुद्धा नव्हते
कोल्हापूरच्या सभेला कोल्हापूरचे कोण होते, असा प्रश्न उपस्थित करून त्यांचे जुने सहकारी सुरेश साळोखे हे देखील या सभेला नव्हते. ती कोल्हापूरचे करमणूक करणारी सभा होती. कोल्हापूरच्या सहा आमदारांचे काय ते आम्ही बघू. चंद्रकांतदादा पाटील यांनीही काही प्रयत्न केले; परंतु पुढच्या वेळी आणखी दोन आमदार वाढवून आणू, असे दुधवडकर म्हणाले.
सिंधुदुर्गात संपलेले, कोल्हापुरात शिवसेना आमदारांना काय संपविणार?
जे स्वत: सिंधुदुर्गात संपले आहेत, ते कोल्हापुरातील शिवसेनेच्या आमदारांना काय संपविणार, असा सवाल यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला. केवळ राजकीय राक्षसी महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या राणे यांची आमचे पुनर्वसन करण्याची गरज नाही. त्यांची लायकी तरी काय आहे, अशा शब्दांत क्षीरसागर यांनी राणेंवर टीका केली. विधानसभेच्या आधी होणाºया लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेचा खासदार येणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले.
भाजपचे बांडगूळ
राणे यांचा पक्ष म्हणजे भाजपचे बांडगूळ असल्याची टीका यावेळी आमदार वैभव नाईक यांनी केली. त्यांना शिवसेनेने घेतले नाही, काँग्रेसवाले कं टाळले, म्हणून मुलांच्या भवितव्यासाठी त्यांनी पक्ष काढलाय. यांना आमदार करायचे, मंत्री करायचे हे उद्धव ठाकरेच ठरवणार. कारण त्यांना ‘शब्द’ देणारे उद्धव ठाकरे यांचा सल्ला घेतात. यांना यांच्या मुलाची काळजी आहे. मात्र, यांच्यासोबत शिवसेना सोडणाºयांची तेवढी काळजी केली का, असा सवाल नाईक यांनी केला. हे आणि यांची दोन मुलं यांचा हा पक्ष म्हणजे खºया अर्थानं प्रा. लि. कंपनी आहे.
ठाकरे विधान भवनात पाठवितात
उद्धव यांनी विधान भवन कधी पाहिले का, असे नारायण विचारतात; पण ठाकरे विधान भवनात जात नाहीत तर तेथे शिवसैनिकांना पाठवितात. ही लिमिटेड कंपनी नसल्यानेच मिल कामगाराचा मुलगा ‘बेस्ट’ अध्यक्ष झाला. वैभव नाईक, राजेश क्षीरसागर आमदार झाले असे दुधवडकर म्हणाले.

Web Title: Thackeray's criticism will not tolerate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.