अंबाबाई मंदिरात ५१ दाम्पत्यांनी केला १०८ शंखपूजेचा धार्मिक विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:44 AM2018-09-01T11:44:02+5:302018-09-01T11:47:46+5:30

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी हैदराबादहून आलेल्या भाविकांनी गरुड मंडपात शंखपूजा केली. यावेळी या परस्थ भाविकांसोबत कोल्हापुरातील ५१ दाम्पत्यांनी १०८ शंखपूजेचा धार्मिक विधी केला.

In the temple of Ambabai Shankha Paushas, ​​51 donors committed 108 consecutive religious rituals | अंबाबाई मंदिरात ५१ दाम्पत्यांनी केला १०८ शंखपूजेचा धार्मिक विधी

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या गरु ड मंडपात हैदराबाद येथील भाविकांनी शंखपूजा विधी केला. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह भाविक उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापुरात अंबाबाई मंदिरात शंखपूजा उत्साहात५१ दाम्पत्यांनी केला १०८ शंखपूजेचा धार्मिक विधी

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी हैदराबादहून आलेल्या भाविकांनी गरुड मंडपात शंखपूजा केली. यावेळी या परस्थ भाविकांसोबत कोल्हापुरातील ५१ दाम्पत्यांनी १०८ शंखपूजेचा धार्मिक विधी केला.

हैदराबादहून निघालेले हे भाविक अठरा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्यानंतर कोल्हापुरात आले. श्रावणनिमित्त त्यांनी गरुड मंडपामध्ये ५१ दाम्पत्यांच्या हस्ते शंखपूजेचे धार्मिक विधी करून अंबाबाई देवीच्या चरणी आरोग्य, कल्याण, समृद्धीची प्रार्थना केली.

या ठिकाणी श्रीगणेश, महादेव व अन्य दैवतांची पूजा करण्यात आली. शंखपूजेसाठी आलेल्या भाविकांनी मंदिराच्या बाह्य भागाची फुलांनी सजावट केली होती. पुष्पसजावटीत मांडण्यात आलेल्या शंखांमुळे ही पूजा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. श्रावण असल्याने पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

या पूजेत कोल्हापुरातील अंबाबाई भक्तही सहभागी झाले होते. यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, सदस्या संगीता खडे, सहसचिव एस. एस. साळवी, मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, आदी उपस्थित होते.


 

 

Web Title: In the temple of Ambabai Shankha Paushas, ​​51 donors committed 108 consecutive religious rituals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.