कोल्हापूर : माती, पाणी आणि सभोवतालाशी बोला, लिहिते व्हाल : कृष्णात खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 04:26 PM2019-01-11T16:26:26+5:302019-01-11T16:31:17+5:30

शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या बाल स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार कृष्णात खोत बोलत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, निसर्गाशी जेव्हा आपण एकरूप होतो, तेव्हाच आपल्याला शब्द सुचतात आणि त्या शब्दातून कथा साकारते.

Talk to the soil, water and surroundings, you'll be writing: Khatko in Krishna | कोल्हापूर : माती, पाणी आणि सभोवतालाशी बोला, लिहिते व्हाल : कृष्णात खोत

कोल्हापूरातील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये सुरु असलेल्या बालस्नेहसंमेलनात शुक्रवारी कृष्णात खोत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी स्वागताध्यक्ष रेश्मा राठोडसह अन्य मान्यवर आणि विद्यार्थी व्यासपीठावर उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देमाती, पाणी आणि सभोवतालाशी बोला, लिहिते व्हाल : कृष्णात खोतशिवाजी मराठा हायस्कूलमध्ये भरले दुसरे बाल साहित्य संमेलन

कोल्हापूर : माती, पाणी आणि आपल्या सभोवतालाशी बोला, नक्की चांगलंच लिहाल, अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार कृष्णात खोत यांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांना आश्वासित केले.

येथील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या बाल स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी खोत बोलत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, निसर्गाशी जेव्हा आपण एकरूप होतो, तेव्हाच आपल्याला शब्द सुचतात आणि त्या शब्दातून कथा साकारते.

या संमेलनाची इयत्ता दहावीत शिकणाऱ्या रेश्मा राठोड या विद्यार्थिनीने स्वागताध्यक्ष म्हणून आपल्या भाषणात फक्त रेकॉर्ड डान्सभोवती गुरफटलेल्या आणि गेल्या काही वर्षातील बदललेल्या हिडीस स्वरुपाच्या स्नेहसंमेलनावर आपले मत व्यक्त केले. या शाळेच्या बालस्नेहसंमेलनाचा आदर्श यावर्षी इतर शाळांनी घेतल्याचा आवर्जुन उल्लेखही तिने आपल्या भाषणात केला.


कोल्हापूरातील शिवाजी मराठा हायस्कूूलमध्ये सुरु असलेल्या बालस्नेहसंमेलनातील कविसंमेलानत शुक्रवारी अशोक पाटील आणि संभाजी चौगुले यांच्यासह बालकवींनी आपल्या कविता सादर केल्या.

'जात आमुची पुसू नका, धर्म आमुचा पुसू नका, उद्यानातील फुलास त्याचा, गंध कोणता पुसू नका' अशा काव्यपंक्तीने विद्यार्थ्यांनी काव्यसंमेलनातही रंगत आणली. आपल्या सुंदर अभिनयाने घरातील पालकांचे मुलांशी असलेले नाते सांगताना विशाल सावंत म्हणाला, ' टि .व्ही ला हात लावू नको, बरणी हातात घेउ नको, फुटून जाईल ... '' शोभा जाधव हिने पाण्याचे महत्व सांगितले. या कवीसंमेलनात विद्यार्थ्यांसोबत बालकवी अशोक पाटील आणि संभाजी चौगुलेही सहभागी झाले. तर कथाकथन सत्रात बालसाहित्यिक मा . ग . गुरव आणि मनिषा झेले यांनी विद्यार्थ्यांसोबत आपल्या कथा सादर केल्या.

या संमेलनाची जबाबदारी सविता प्रभावले, संजय गुरव, मानसी सरनाईक, अमर चोपडे, सागर संकपाळ, आण्णापा माळी, अमर जगताप, प्रशांत पोवार या विद्यार्थ्यांनी सांभाळली.


कोल्हापूरातील शिवाजी मराठा हायस्कूूलमध्ये सुरु असलेल्या बालस्नेहसंमेलनात शुक्रवारी काढलेल्या ग्रंथदिंडीत विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशात सहभागी झाले होते.


वारकऱ्यांच्या वेशात विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी


या संमेलनाला ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. वारकऱ्यांच्या वेशात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी शाळा परिसरातून ग्रंथ दिंडी काढली. ग्रंथदिंडीचे उद्घाटन शिक्षण निरीक्षक डी. एस. पोवार यांनी केले. यावेळी मेघराज खराडे, शिवतेज खराडे, मुख्याध्यापक प्रविण काटकर उपस्थित होते.

गांधी फॉर टुमारो पथनाट्याने समारोप

वर्धा येथील सर्वोदयी शाळेतील शिक्षकाने लिहिलेल्या गांधी फॉर टुमारो या पथनाट्याने या संमेलनाचा समारोप होत आहे. हे पथनाट्य संजय हळदीकर यांनी दिग्दर्शित केले आहे. तीन सत्रात पथनाट्यासह गीत गायन, पर्यावरणविषयक लघुपट आणि लोकनृत्यांचा समावेश आहे. निर्मला शितोळे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Talk to the soil, water and surroundings, you'll be writing: Khatko in Krishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.