नोकरीसाठी नव्हे, तर ज्ञानासाठी शिक्षण घ्या : - डी. ए. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:19 AM2019-06-21T00:19:16+5:302019-06-21T00:19:52+5:30

आजच्या युवकांनी नोकरी मिळावी म्हणून शिक्षण घेऊ नये, तर व्यापक ज्ञानासाठी शिक्षण घ्यावे आणि या ज्ञानाच्या बळावर व्यवसायाची शिखरे पादाक्रांत करावीत, असे

 Take education not only for education, but for: - A. Patil | नोकरीसाठी नव्हे, तर ज्ञानासाठी शिक्षण घ्या : - डी. ए. पाटील

नोकरीसाठी नव्हे, तर ज्ञानासाठी शिक्षण घ्या : - डी. ए. पाटील

Next
ठळक मुद्दे‘आम्ही काळम्मावाडीकर’च्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

राधानगरी : आजच्या युवकांनी नोकरी मिळावी म्हणून शिक्षण घेऊ नये, तर व्यापक ज्ञानासाठी शिक्षण घ्यावे आणि या ज्ञानाच्या बळावर व्यवसायाची शिखरे पादाक्रांत करावीत, असे आवाहन राधानगरीचे गटशिक्षणाधिकारी डी. ए. पाटील यांनी केले.

ते विद्यामंदिर काळम्मावाडी येथे आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी बोलत होते. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेला ‘आम्ही काळम्मावाडीकर’ या व्हॉटस अ‍ॅप गु्रपच्यावतीने या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नाट्यकार सुनील माने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फराळेचे सरपंच संदीप डवर होते. यावेळी त्यांनी शैक्षणिक कार्यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने सर्वोतोपरी मदत करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.

गुणवंत विद्यार्थी : किरण भाबर (बीएसस्स्सी ९० टक्के), अभिजित पाटील (बीए). अश्विनी पाटील, आरती हातकर (सिव्हील डिप्लोमा). स्नेहल मुंज, पूजा माने, राजश्री सुतार, शिवानी ढोकरे, संदेश ढोकरे (सर्व १२ वी ). सचिन सुतार, शार्दुल केळोस्कर, सानिका मुंज, सानिका माने, भाग्यश्री भोगुलकर, ज्योती भाबर (सर्व १० वी ).

यावेळी मुख्याध्यापक संतोष कांबळे, बाबूराव नाटेकर, ग्रामपंचायत सदस्या रेखा मुंज, अनिल माने, सुनील पातले, अनिल महाडिक, सागर केळोस्कर, जयवंत पाटील, सुनील महाडिक, अनंत मुंज, बाजीराव केळोस्कर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन रमाकांत पाटील यांनी केले. प्रस्ताविक चंद्रकांत पाटील यांनी केले. आभार वाय. डी. पाटील यांनी मानले.

अपार कष्टाला पर्याय नाही : राजश्री पातले
पीएसआयपदी निवड झालेल्या राजश्री सुनील पातले (पनोरी) यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून आतापासूनच अभ्यासाचे नियोजन केले पाहिजे. संकटे येणार, अपयश येणार, यावर मात करतच जिद्दीने स्पर्धा परीक्षांमध्ये विजय मिळविला पाहिजे.


काळम्मावाडीत आयोजित सत्कार समारंभात गटशिक्षणाधिकारी डी. ए. पाटील यांचे स्वागत ज्येष्ठ नाट्यकार सुनील माने यांनी केले. यावेळी सरपंच संदीप डवर, मुख्याध्यापक संतोष कांबळे उपस्थित होते.

Web Title:  Take education not only for education, but for: - A. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.