दुहेरी प्राध्यापकांवर १५ दिवसांत कारवाई करा, प्रायव्हेट क्लासेस टिचर्स असोसिएशनची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:55 AM2019-03-13T11:55:58+5:302019-03-13T11:57:36+5:30

दुहेरी प्राध्यापकांवर १५ दिवसांत कारवाई करावी. कॉलेजमधील प्राध्यापकांनी खाजगी शिकवणी वर्ग बंद करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टिचर्स असोसिएशनने (केप्टा) केली. या मागणीचे निवेदन असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मेन राजाराम ज्युनिअर कॉलेज, न्यू कॉलेज, एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यांना दिले.

Take action on double professors within 15 days, Private Classes Teachers Association demand | दुहेरी प्राध्यापकांवर १५ दिवसांत कारवाई करा, प्रायव्हेट क्लासेस टिचर्स असोसिएशनची मागणी

कोल्हापुरात दुहेरी प्राध्यापकांवर कारवाई करा, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टिचर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. एस. एस. चव्हाण यांना दिले.

googlenewsNext
ठळक मुद्देदुहेरी प्राध्यापकांवर १५ दिवसांत कारवाई करा, प्रायव्हेट क्लासेस टिचर्स असोसिएशनची मागणी विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांना निवेदन

कोल्हापूर : दुहेरी प्राध्यापकांवर १५ दिवसांत कारवाई करावी. कॉलेजमधील प्राध्यापकांनी खाजगी शिकवणी वर्ग बंद करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टिचर्स असोसिएशनने (केप्टा) केली. या मागणीचे निवेदन असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मेन राजाराम ज्युनिअर कॉलेज, न्यू कॉलेज, एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यांना दिले.

कॉलेजमधील प्राध्यापक हे कोल्हापूर शहरामध्ये बेकायदेशीररीत्या खाजगी शिकवणी वर्ग घेत आहेत. शाश्वत पगाराची सरकारी नोकरी असतानादेखील काही प्राध्यापक विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक गुणांचे आमिष दाखवून, विद्यार्थ्यांना त्यांच्या क्लासेसमध्ये प्रवेश घेण्याची सक्ती करत आहेत. या दुहेरी प्राध्यापकांवर सक्त कारवाई करावी, अशी मागणी असोसिएशनने या निवेदनाद्वारे केली आहे.

या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुभाष देसाई, उपाध्यक्ष अतुल निंगुरे, संजय यादव, उल्हास मुणसे, संजय वराळे, रंगराव जाधव, संजय देसाई, कोल्हापूर जिल्हा भगिनी क्लासेस टिचर्स असोसिएशनच्या अध्यक्षा संगीता स्वामी, भारती आरगे, मधुरा देसाई, उदय शिपेकर, विवेक हिरवडेकर, आदींचा समावेश होता.

 

 

Web Title: Take action on double professors within 15 days, Private Classes Teachers Association demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.