जिल्ह्यात स्वाईन फ्लूची लागण -: पाच महिन्यांत ११५ संशयित, तर ४७ स्वाईनबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:57 AM2019-05-18T00:57:26+5:302019-05-18T00:58:43+5:30

आरोग्यासाठी अत्यंत सुदृढ वातावरण असलेल्या कोल्हापूरला स्वाईन फ्लूचा विळखा पडत आहे. मागील वर्षापासून सुरू झालेली स्वाईन फ्लूची साथ अद्याप थांबलेली नाही. जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये २९ जणांचा जीव स्वाईनने घेतला. गेल्या पाच महिन्यांत ११५ रुग्ण संशयित म्हणून दाखल झाले. यातील ४७ जणांना स्वाईनची लागण झाली.

Swine flu infection in the district: - In five months, 115 suspects and 47 are self-linked | जिल्ह्यात स्वाईन फ्लूची लागण -: पाच महिन्यांत ११५ संशयित, तर ४७ स्वाईनबाधित

जिल्ह्यात स्वाईन फ्लूची लागण -: पाच महिन्यांत ११५ संशयित, तर ४७ स्वाईनबाधित

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णांच्या संख्येत वाढ

संतोष पाटील ।
कोल्हापूर : आरोग्यासाठी अत्यंत सुदृढ वातावरण असलेल्या कोल्हापूरलास्वाईन फ्लूचा विळखा पडत आहे. मागील वर्षापासून सुरू झालेली स्वाईन फ्लूची साथ अद्याप थांबलेली नाही. जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये २९ जणांचा जीव स्वाईनने घेतला. गेल्या पाच महिन्यांत ११५ रुग्ण संशयित म्हणून दाखल झाले. यातील ४७ जणांना स्वाईनची लागण झाली.

११८ विविध प्रकारच्या एच१ एन१ व्हायरसमुळे होणाऱ्या स्वाईनने कोल्हापुरातील वातावरणाशी जुळवून घेतल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पर्यटनाच्या निमित्ताने होणारी कोल्हापुरातील गर्दी हे स्वाईन संसर्गाचे प्रमुख कारण आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात १२७ रुग्ण स्वाईन फ्लू पॉझिटीव्ह होते. त्यापैकी शहरात ३७ व ग्रामीण भागातील ९० रुग्ण होते. त्यापैकी शहरातील स्वाईन फ्लूचे २४ रुग्ण बरे झाले, तर नऊ रुग्ण मयत झाले. तसेच ग्रामीण भागातील ३९ रुग्णांपैकी २० रुग्ण मरण पावले होते. खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्यांची संख्या याच्या दुप्पट आहे. सर्दी, खोकला, ताप ही सामान्य आजारांची लक्षणेच स्वाईनची असू शकतात; त्यामुळे काळजी घेणे, प्रतिबंधक उपाय योजने हेच यावर औषध आहे.

ज्यांना श्वसनाचा आधीपासूनच त्रास आहे, दमा अशांना रिलेंझा हे औषध देता येत नाही; कारण यामुळे श्वसनाच्या अधिक समस्या उद्भवू शकतात.


स्वाईन फ्लूवर औषधोपचार कोणते ?
टॉमी फ्लू किंवा रिलेंझा ही औषधे स्वाईन फ्लूवर उपचार म्हणून दिली जातात. लक्षणे दिसण्याच्या ४८ तासांच्या आत ही औषधे घ्यावी लागतात. ही औषधे योग्य वेळेवर घेतल्यास फ्लूचा कालावधी १ ते २ दिवसांनी कमी करता येतो. ही औषधे ५ ते ७ दिवसांसाठी दिली जातात. स्वाईन फ्लूवर प्रतिबंधात्मक लस निघाली आहे. ती नाकाद्वारे किंवा टोचून घेता येते. या प्रतिबंधात्मक औषधांमुळे उदासीनता, धडधड वाढणे, भीती वाटणे, एकाग्रता कमी होणे व उलट्या होणे यांसारखे प्रादुर्भाव होऊ शकतात.

शिंकताना नाकातोंडावर रुमाल ठेवणे.
आजारी व्यक्तीच्या संपर्कात राहू नये.
फ्लूसारखी लक्षणे दिसू लागल्यावर सात दिवस किंवा लक्षणे गायब होण्याच्या २४ तासांपर्यंत घरातच थांबा जेणेकरून संसर्ग टळेल.
हात साबण व स्वच्छ पाण्याने नियमित धुवा.
डोळ्यांना, नाकाला व तोंडाला वारंवार हात लावणे टाळावे.
गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा.
ज्यांना श्वसनाचे आजार आहेत, त्यांच्याशी संपर्क टाळा.
भरपूर झोप आणि पौष्टिक आहार घ्या.
घरातील हवा मोकळी राहील, याची
दक्षता घ्यावी.
आरोग्यदायी सवयींचे कटाक्षाने पालन करावे.

जर आपण गेल्या १0 दिवसांत प्रादुर्भाव असलेल्या भागातून प्रवास केला असेल व स्वाईन फ्लूची लक्षणे दिसत असतील, तर दवाखान्यांशी संपर्क साधावा. घाबरून जाऊ नका. - डॉ. साईप्रसाद


‘स्वाईन’मुळे काय होते?
१ फुफ्फुसाचे विकार
२ तीव्र हृदयविकार
३ तीव्र मूत्रपिंडाचे विकार
४ तीव्र यकृताचे विकार
५ तीव्र न्युरोलोजिकल विकार

Web Title: Swine flu infection in the district: - In five months, 115 suspects and 47 are self-linked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.