कोल्हापूरच्या महापौरपदासाठी काँग्रेसकडून स्वाती येवलुजे यांची घोषणा, उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे सुनील पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 04:27 PM2017-12-18T16:27:00+5:302017-12-18T17:00:28+5:30

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी काँग्रेसकडून स्वाती येवलुजे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या सुनील पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजप-ताराराणी आघाडीकडून महापौर पदासाठी मनीषा कुंभार तर उपमहापौर पदासाठी कमलाकर भोपळे यांनी आपला उमेदवारी अर्ज नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे सोमवारी दाखल केला.

Swati Yalujenja announces Congress nomination for Kolhapur Mayor, NCP's Sunil Patil for Deputy Mayor post | कोल्हापूरच्या महापौरपदासाठी काँग्रेसकडून स्वाती येवलुजे यांची घोषणा, उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे सुनील पाटील

कोल्हापूरच्या महापौरपदासाठी काँग्रेसकडून स्वाती येवलुजे यांची घोषणा, उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे सुनील पाटील

Next
ठळक मुद्देकोल्हापूरच्या महापौरपदासाठी काँग्रेसकडून स्वाती येवलुजे यांची घोषणा, उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे सुनील पाटील भाजप-ताराराणी आघाडीकडून महापौरपदासाठी मनिषा कुंभारउपमहापौर पदासाठी कमलाकर भोपळे

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी काँग्रेसकडून स्वाती येवलुजे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या सुनील पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजप-ताराराणी आघाडीकडून महापौर पदासाठी मनीषा कुंभार तर उपमहापौर पदासाठी कमलाकर भोपळे यांनी आपला उमेदवारी अर्ज नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे सोमवारी दाखल केला.

स्वाती येवलुजे

कोल्हापूरच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (दि. २२) होत असून त्या पार्श्वभूमीवर महापौरपदाचा उमेदवार निश्चितीसाठी रविवारी आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस कमिटीत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, या पदासाठी आज, सोमवारी दुपारी १ वाजता नावाची उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यांनी दुपारी नामनिर्देशन पत्र दाखल केले.

हसिना फरास यांनी मंगळवारी महापौरपदाचा, तर अर्जुन माने यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन पदाधिकारी निवडणूक शुक्रवारी सर्वसाधारण सभेत होत आहे. स्वाती येवलुजे यांच्यासह काँग्रेसतर्फे महापौरपदासाठी दीपा मगदूम, उमा बनछोडे, नीलोफर आजरेकर इच्छुक होत्या.

आमदार सतेज पाटील व शहर जिल्हा कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, महिला काँग्रेस शहराध्यक्ष संध्या घोटणे यांनी रविवारी संवाद साधला तसेच महापौरपदासाठी इच्छुक असणाऱ्या दीपा मगदूम, स्वाती यवलुजे, उमा बनछोडे, नीलोफर आजरेकर या चारही नगरसेविकांच्या मुलाखती घेतल्या.

ओबीसी महिला या प्रवर्गासाठी महापौरपद असल्यामुळे जे उमेदवार नामनिर्देशनपत्रे भरणार आहेत. त्यांना नामनिर्देशन पत्र भरताना सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची तसेच पडताळणी समितीने दिलेल्या वैधता प्रमाणपत्राची छायांकीत प्रत सादर करावी लागणार आहे. ही सभा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

Web Title: Swati Yalujenja announces Congress nomination for Kolhapur Mayor, NCP's Sunil Patil for Deputy Mayor post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.