‘लोकमत’ला सदिच्छांचे पाठबळ -वर्धापनदिन; स्नेहमेळाव्यास वाचकांची मांदियाळी; आरोग्य विशेषांकाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:07 AM2018-08-21T01:07:10+5:302018-08-21T01:08:11+5:30

कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी रोखठोक भूमिका घेणाऱ्या आणि विधायकतेचा आवाज उंच करणाºया ‘लोकमत’चा चौदावा वर्धापनदिन सोमवारी संध्याकाळी वाचकांच्या मांदियाळीमध्ये संपन्न झाला. यानिमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘आरोग्य संपदा’ या विशेषांकाचेही वाचकांनी स्वागत केले.

Support for 'Lokmat' - Anniversary; Readers' tweet; Welcomes Health Specialist | ‘लोकमत’ला सदिच्छांचे पाठबळ -वर्धापनदिन; स्नेहमेळाव्यास वाचकांची मांदियाळी; आरोग्य विशेषांकाचे स्वागत

‘लोकमत’ला सदिच्छांचे पाठबळ -वर्धापनदिन; स्नेहमेळाव्यास वाचकांची मांदियाळी; आरोग्य विशेषांकाचे स्वागत

Next

कोल्हापूर : जिल्ह्याच्या विकासासाठी रोखठोक भूमिका घेणाऱ्या आणि विधायकतेचा आवाज उंच करणाºया ‘लोकमत’चा चौदावा वर्धापनदिन सोमवारी संध्याकाळी वाचकांच्या मांदियाळीमध्ये संपन्न झाला. यानिमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘आरोग्य संपदा’ या विशेषांकाचेही वाचकांनी स्वागत केले.

‘लोकमत’च्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यासाठी येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये सायंकाळी पाच वाजल्यापासून मान्यवरांसह वाचकांनी मोठी गर्दी करायला सुरुवात केली. एकीकडे मान्यवर, कार्यकर्ते शुभेच्छा देत असताना ‘लोकमत’मुळे कोणकोणते प्रश्न मार्गी लागले याचीही एकमेकांना आठवण करून देत असल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले. पावसानेही उघडीप दिल्याने वाचकांनी स्नेहमेळाव्याचा आनंद लुटला.

प्रारंभी महापौर शोभा बोंद्रे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, ज्येष्ठ प्रसूतीतज्ज्ञ डॉ. ज. ल. नागावकर, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन स्नेहमेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी आरोग्य विशेषांकाचेही प्रकाशन करण्यात आले.

‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले आणि वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी उपस्थितांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज,आमदार हसन मुश्रीफ, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी मंत्री जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे, भरमूआण्णा पाटील, माजी खासदार निवेदिता माने, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे अध्यक्ष संजय मंडलिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा पोलीसप्रमुख अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारीअधिकारी डॉ. रवी शिवदास, डॉ. संतोष प्रभू, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अशोक चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, अरुंधती महाडिक, ॠतुराज पाटील, प्रतिमा पाटील, अ‍ॅड. शिवाजीराव राणे, अ‍ॅड. अजित मोहिते, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, क्रीडाईचे अध्यक्ष महेश यादव, केआयटीचे अध्यक्ष भरत पाटील, वसंत मुळीक, मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गनी आजरेकर, हिंदकेसरी दीनानाथसिंह, रिपब्लिकन पक्षाचे उत्तम कांबळे, प्रा.विश्वास देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

सकाळी उर्वरित विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि दैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, आमदार अमल महाडिक, ‘गोकुळ’ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील, मलकापूरचे नगराध्यक्ष अमोल केसरकर यांनी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, ‘पुणे म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने, शिवाजी विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. आर. के. कामत, शेतकरी संघाचे माजी संचालक सुरेश देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे यांनी दूरध्वनीवरून ‘लोकमत’ला शुभेच्छा दिल्या.

 

Web Title: Support for 'Lokmat' - Anniversary; Readers' tweet; Welcomes Health Specialist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.