शिवाजी मार्केटमधील दुकानास आग  : नऊ  लाखांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 06:45 PM2019-04-17T18:45:47+5:302019-04-17T18:48:48+5:30

  कोल्हापूर : येथील शिवाजी चौकातील शिवाजी मार्केटच्या तळमजल्यात असणाऱ्या श्रीकृष्ण किराणा स्टोअर्स या दुकानाला बुधवारी पहाटे आग लागून ...

Stores fire in Shivaji Market -: loss of nine lakhs, grocery material burnt | शिवाजी मार्केटमधील दुकानास आग  : नऊ  लाखांचे नुकसान 

शिवाजी मार्केटमधील दुकानास आग  : नऊ  लाखांचे नुकसान 

Next
ठळक मुद्देआग शॉर्ट सर्किटने लागली असण्याची शक्यता किराणा साहित्य जळून खाक    

 कोल्हापूर : येथील शिवाजी चौकातील शिवाजी मार्केटच्या तळमजल्यात असणाऱ्या श्रीकृष्ण किराणा स्टोअर्स या दुकानाला बुधवारी पहाटे आग लागून संपूर्ण दुकान जळून खाक झाले. दुकानातील धान्यासह संपूर्ण किराणा माल आगीच्या भक्षस्थानी पडला. आगीत सुमारे आठ ते नऊ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली आहे.  

महापालिकेच्या शिवाजी मार्केटच्या तळमजल्यातील दोन दुकानगाळ्यात राजेश व गणेश भरतू बुड्डे (रा. बाजार गेट, महानगरपालिकेनजीक) या बंधूंचे श्रीकृष्ण जनरल स्टोअर्स हे किराणा मालाचे दुकान आहे. बुधवारी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास श्रीकृष्ण जनरल स्टोअर्सच्या दुकानातून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. त्यावेळी काहींनी तातडीने अग्निशमन दलास फोन करून कळविले. तातडीने अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी दुकानातून धुराचे लोट बाहेर येत होते. त्यांनी तातडीने दुकानाचे शटर कटरने कापून दुकान उघडले; पण दुकानात दारातच विविध धान्यांनी भरलेली पोती तसेच कौंटरचा अडथळा असल्याने जवानांना आत जाण्याची संधीच नव्हती. त्यात धुरामुळे दुकानातील काहीच दिसत नव्हते.

त्यावरच पाण्याचा मारा करत सुमारे दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली. त्यावेळी दुकानमालक बुड्डे बंधू तसेच त्यांचे मित्र तातडीने घटनास्थळी आले. त्यावेळी आगीत संपूर्ण दुकानातील किराणा साहित्य जळून खाक झाले होते. 
या आगीत दुकानातील विविध धान्यांची पोती, मसाल्याचे पदार्थ, किराणा मालाचे साहित्य जळून खाक झाले. आग विझल्यानंतर सायंकाळपर्यंत दुकानातील जळलेले साहित्य काढण्याचे काम सुरू होते. प्लास्टिकच्या पॅकिंगमध्ये असणाºया तेलामुळे ही आग पसरली होती. आगीत जळल्याने आणि पाण्याचा मारा झाल्याने दुकानातील ९० टक्के साहित्याचे नुकसान झाले.

वृत्तपत्र विक्रेत्याच्या दक्षतेमुळे पुढील अनर्थ टळला
पहाटेच्या सुमारास या शिवाजी मार्केटमधील अनेक दुकानांत कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशनचे अध्यक्ष किरण व्हनगुत्ते हे वृत्तपत्र टाकतात. बुधवारी पहाटे पावणेपाच वाजता व्हनगुत्ते हे मार्केटच्या इमारतीत वृत्तपत्र टाकण्यासाठी गेले असता त्यांना संपूर्ण मार्केटच्या आतील बाजूस धुराचे लोट दिसले, तर अंधारातच श्रीकृष्ण जनरल स्टोअर्स दुकानात शटरच्या खालून आग बाहेर येताना दिसली. त्या धुराच्या लोटामध्ये व्हनगुत्ते गुदमरले होते. त्यांनी त्यावेळी तातडीने मार्केटबाहेर येऊन अग्निशामक दलास फोन करून कल्पना दिली, .त्यामुळे अग्निशमन दलाचे बंब  तातडीने घटनास्थळी येऊन आग अटोक्यात आली. अन्यथा या दुकानाच्या परिसरात अनेक दुकाने आहेत. किरण व्हनगुते यांनी वेळीच दक्षता घेऊन अग्निशमन दलास कळविल्याने पुढील अनर्थ टळला.

आयुक्त व लोकप्रतिनिधींकडून पाहणी 
घटना घडल्यानंतर तातडीनेआयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आमदार राजेश क्षीरसागर, नगरसेविका उमा बनसोडे, माजी नगरसेवक श्रीकांत बनसोडे तसेच महापालिकेच्या इतर अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

-------------
फोटो देतो.. तानाजी

Web Title: Stores fire in Shivaji Market -: loss of nine lakhs, grocery material burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.