कोल्हापूर : जोतिबा डोंगरावरील पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:04 PM2018-09-08T12:04:28+5:302018-09-08T12:06:05+5:30

जोतिबा डोंगरावरील हनुमान भक्ताकडून श्रावणातील शनिवार निमित्त अकरा गावातील अकरा मारुती दर्शन पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला. 

Start at Dindi Festival on Jyotiba Mountain | कोल्हापूर : जोतिबा डोंगरावरील पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ

कोल्हापूर : जोतिबा डोंगरावरील पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ

Next
ठळक मुद्देजोतिबा डोंगरावरील पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभमहाप्रसाद वाटपाने दिंडीची सांगता

जोतिबा : जोतिबा डोंगरावरील हनुमान भक्ताकडून श्रावणातील शनिवार निमित्त अकरा गावातील अकरा मारुती दर्शन पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला. 

शनिवार पहाटे ५ वाजता जोतिबा देवास अभिषेक आरती करुन जय जय हनुमान च्या जयघोषात दिंडीस सुरुवात झाली.

यमाई दर्शन करून दिंडी गिरोली. सादळे. पोहाळे, कुशिरे गांवातील मारूतीचे दर्शन करुन ११ वाजता केर्ली गावातील मारूती मंदिरात पोहचली.

पुढे ही दिंडी केर्ले,  आसुर्ले, राक्षी, दानेवाडी, जाफळे गावातील मारुतीचे दर्शन करून परत जोतिबा डोंगरावरील जोतिबा मंदिरात सांय ६ वाजता दाखल झाली. आरती, महाप्रसाद वाटपाने दिंडीची सांगता झाली.

एक हजार हनुमान भक्तांनी अनवाणी ४० कि.मी. चा पायी प्रवास ११ तासात अकरा गावातील मारूती चे दर्शन घेतले. दिंडी मार्गावर फराळ वाटप करण्यात आले. प्रत्येक हनुमान मंदिरात महाभिषेक, आरती करण्यात आली .

Web Title: Start at Dindi Festival on Jyotiba Mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.