कोल्हापूरात एसटी संपकरी आक्रमक, खासगी वाहन काढले बसस्थानकाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 04:45 PM2017-10-17T16:45:48+5:302017-10-17T17:54:25+5:30

एसटी कर्मचाऱ्याच्या संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी ४ वाजता खासगी गाड्यांना मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, त्याला संपकरी कर्मचाऱ्यानी जोरदार विरोध केल्याने कोल्हापूर बसस्थानक परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. कर्मचाऱ्यानी आक्रमक भूमिका घेत खासगी वाहन बसस्थानक परिसरातून बाहेर काढले.

ST commuters in Kolhapur, aggressive, private vehicle removed outside bus station | कोल्हापूरात एसटी संपकरी आक्रमक, खासगी वाहन काढले बसस्थानकाबाहेर

कोल्हापूरात एसटी संपकरी आक्रमक, खासगी वाहन काढले बसस्थानकाबाहेर

googlenewsNext
ठळक मुद्देथेट बसस्थानक परिसरात खासगी वाहने कोल्हापूर बसस्थानक परिसरात प्रचंड तणाव बसस्थानक परिसरात पोलिस छावणीचे स्वरुप पोलिसांनी आणली परिसरात संचलन करुन परिस्थिती नियंत्रणात

कोल्हापूर, दि. १७ : एसटी कर्मचाऱ्याच्या संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी ४ वाजता खासगी गाड्यांना मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, त्याला संपकरी कर्मचाऱ्यानी  जोरदार विरोध केल्याने कोल्हापूर बसस्थानक परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.

कर्मचाऱ्यानी  आक्रमक भूमिका घेत खासगी वाहन बसस्थानक परिसरातून बाहेर काढले. कोल्हापूर बस स्थानकाच्या २०० मिटर परिसरात आलेल्या या खाजगी आराम बसवर संपकºयांनी दगडफेक केली.

एसटी महामंडळाने पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व खासगी वाहनांना राज्य शासनाने वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूरातही प्रशासनाने थेट बसस्थानक परिसरात खासगी वाहने नेण्याचा फंडा वापरला. मात्र संपकरी कर्मचाऱ्यानी  हा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले.



यामुळे बसस्थानक परिसरात पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. पोलिसांनी बसस्थानक परिसरात आणि रेल्वे स्टेशन रोडवरुन संचलन करुन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

एसटी कर्मचाऱ्यानी  सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी आजपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. या संपामुळे सर्व एसटी बसेस आगारात उभ्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. हा बेमुदत संप असल्याने प्रवाशांची आणखीनच गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने खासगी वाहनधारकांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली होती.

Web Title: ST commuters in Kolhapur, aggressive, private vehicle removed outside bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.