साताऱ्यातील सहा गुंडांना अटक- पाचगाव परिसरात कारवाई; २ पिस्तुले, ७ जिवंत काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:55 AM2018-12-19T00:55:02+5:302018-12-19T00:56:22+5:30

सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीत असणाºया फलटण-कºहाड येथील सहा सराईत गुंडांना कळंबा-पाचगाव रस्त्यावर पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तुले, सात जिवंत काडतुसे, दोन कार असा सुमारे २९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Six suspects arrested in Satara; 2 pistols, 7 live cartridges seized | साताऱ्यातील सहा गुंडांना अटक- पाचगाव परिसरात कारवाई; २ पिस्तुले, ७ जिवंत काडतुसे जप्त

साताऱ्यातील सहा गुंडांना अटक- पाचगाव परिसरात कारवाई; २ पिस्तुले, ७ जिवंत काडतुसे जप्त

googlenewsNext

कोल्हापूर : सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीत असणाºया फलटण-कºहाड येथील सहा सराईत गुंडांना कळंबा-पाचगाव रस्त्यावर पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तुले, सात जिवंत काडतुसे, दोन कार असा सुमारे २९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आणखी तिघे संशयित पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मानसिंह खोचे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

संशयित किरण गुलाब गावित (वय २९, रा. सैदापूर, कºहाड, जि. सातारा), श्रीकांत ऊर्फ गोट्या चंद्रकांत कदम (३०, रा. कॉलेज रोड, शुक्रवार पेठ, फलटण, जि. सातारा), चेतन शिवाजी कांबळे (३२), संदीप शिवाजी कांबळे (३३, दोघे रा. शारदानगर, काळकी, शिवतेज निवास, ता. फलटण, जि. सातारा), शिवराज सुरेश इंगवले (२५, रा. लाहोटीनगर, मलकापूर, कºहाड, जि. सातारा), नितीन गणपत शिर्के (२७, रा. नांदलापूर, ता. कºहाड, जि. सातारा)

अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस निरीक्षक खोचे यांना कोल्हापुरातील कळंबा आय.टी.आय. ते पाचगाव या रस्त्यावर काही गुंड दोन कारमधून येऊन पिस्तुलमधून गोळ्या घालून दरोडा टाकणार आहेत, अशी माहिती खबºयाकडून मिळाली. त्यांनी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक राजू डांगे यांच्यासह तीन पथके तयार करून सोमवारी (दि.१७) दुपारी पाचगाव रस्त्यावर पाळत ठेवली. काही वेळाने त्या रस्त्याने हनुमाननगर बसस्टॉप येथे दोन कार येऊन थांबल्या. त्यातून काही लोक खाली उतरून टेहळणी करू लागले. पथकाला त्यांचा संशय येताच वेशांतर केलेल्या पोलिसांनी जिवाचीही पर्वा न करता या सहाजणांवर झडप घातली.

पोलिसांनी अचानक पकडताच सर्वजण भांबावून गेले. त्यातील तिघे संशयित पळून गेले. सहाजणांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची झडती घेतली असता दोन पिस्तुले आणि सात जिवंत काडतुसे मिळून आली. त्यांनी वाटसरूंना पिस्तुलाचा धाक दाखवून लूटमार करणार होतो, अशी कबुली दिली. त्यांनी पिस्तुले कोठून खरेदी केली. आणखी कुठे लूटमार, दरोड्याचे गुन्हे केलेत याची चौकशी सुरू आहे. गुन्ह्यात वापरलेली वाहने ही चेतन कांबळे व नितीन शिर्के यांच्या मित्राची आहेत. त्यांच्या आणखी तिघा साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. संशयित संदीप कांबळे हा व्यवसायाने वकील आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे करीत आहेत.
 

सराईत गुन्हेगार
संशयित किरण गावित हा टोळीचा म्होरक्या आहे. कºहाड येथील गुंड सल्या चेप्या याने महाराष्ट केसरी पैलवान संजय पाटील यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. त्यानंतर वाळूमाफियांच्या वादातून सल्यावर संशयित गावितने न्यायालयाच्या आवारात गोळ्या झाडल्या होत्या. त्यामध्ये दोन वर्षांनी सल्याचा मृत्यू झाला. गावित याची कºहाड-फलटण परिसरात मोठी दहशत आहे. त्याच्यासह अन्य संशयितांवर दरोडा, खुनाचा प्रयत्न, मुली पळवून नेणे, हाणामारी, लूटमारीचे फलटण आणि कºहाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

सल्या चेप्यावर केला होता गावितने गोळीबार
संशयित किरण गावित हा टोळीचा म्होरक्या आहे. कºहाड येथील गुंड सल्या चेप्या याने महाराष्टÑ केसरी पैलवान संजय पाटील यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. त्यानंतर वाळूमाफियांच्या वादातून सल्यावर संशयित गावितने न्यायालयाच्या आवारात गोळ्या झाडल्या होत्या. त्यामध्ये दोन वर्षांनी सल्याचा मृत्यू झाला. गावित याची कºहाड-फलटण परिसरात मोठी दहशत आहे. त्याच्यासह अन्य संशयितांवर दरोडा, खुनाचा प्रयत्न, मुली पळवून नेणे, हाणामारी, लूटमारीचे फलटण आणि कºहाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.



संशयित आरोपींकडून जप्त केलेली पिस्तुले व काडतुसे वाहने. (छाया : नसीर अत्तार)


 

Web Title: Six suspects arrested in Satara; 2 pistols, 7 live cartridges seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.