एसआयटीकडून वाघमारेची तासभर चौकशी-पानसरेंच्या मारेकऱ्यांशी कनेक्शनचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:05 AM2018-06-19T00:05:15+5:302018-06-19T00:05:15+5:30

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील शार्प शूटर परशुराम वाघमारे याच्याकडे महाराष्ट्र ‘एसआयटी’च्या पथकाने बंगलोर येथे सोमवारी तासभर चौकशी केल्याचे समजते.

SIT asks Waghmare for an hour-long inquiry-search connection with the killers of Panesar | एसआयटीकडून वाघमारेची तासभर चौकशी-पानसरेंच्या मारेकऱ्यांशी कनेक्शनचा शोध सुरू

एसआयटीकडून वाघमारेची तासभर चौकशी-पानसरेंच्या मारेकऱ्यांशी कनेक्शनचा शोध सुरू

Next
ठळक मुद्देपाच वर्षांचे मोबाईल सीडीआर मागविले

कोल्हापूर : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील शार्प शूटर परशुराम वाघमारे याच्याकडे महाराष्ट्र ‘एसआयटी’च्या पथकाने बंगलोर येथे सोमवारी तासभर चौकशी केल्याचे समजते. कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकºयांपर्यंत पोहोचण्या-साठी त्याच्याकडून काही पुरावे मिळतात का, याचा शोध पथक घेत आहे. त्याचे पाच वर्षांतील मोबाईल सीडीआर मागविले आहेत. त्याचे संशयित वीरेंद्र तावडे, समीर गायकवाड, फरार आरोपी विनय पवार, सारंग अकोेलकर यांच्याशी काही कनेक्शन आहे काय, याचा शोध पथक घेत असल्याचे एसआयटीच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत समीर गायकवाड व वीरेंद्र तावडे या दोघांना अटक झाली आहे. या दोघांनाही पानसरे खटल्यामध्ये जामीन मिळाला आहे. या हत्येतील संशयित पवार व अकोलकर हे मडगाव-गोवा बॉम्बस्फोटापासून फरार आहेत.‘एसआयटी’ला त्यांचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. संशयित वाघमारेच्या चौकशीत कॉ. पानसरे व डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येसंबधी काही महत्त्वाची माहिती हाती लागल्याचे समजल्याने महाराष्ट्राचे एसआयटी पथक रविवारी बंगलोरला रवाना झाले होते. या पथकाने सोमवारी बंगलोर एसआयटीच्या अधिकाºयांशी चर्चा करून वाघमारेकडे तासभर चौकशी केल्याचे समजते. याबाबत मात्र गोपनियता पाळली आहे.

‘समोर आल्यास वाघमारेला ओळखू’
संशयित परशुराम वाघमारेला माझ्यासमोर आणले तर त्याला ओळखू, असे पानसरे हत्या प्रकरणातील एका साक्षीदाराने कोल्हापुरात प्रसारमाध्यमांना सोमवारी सांगितले. डॉ. नरेंद्र दाभोलकर ते लंकेश हत्या प्रकरणातील संशयितांचा शुभ, अशुभ गोष्टींवर विश्वास आहे. त्यामुळे पहिल्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल शुभ मानून त्याच पिस्तुलातून अन्य दोन हत्या केल्याचा संशय या साक्षीदारांने व्यक्त केला आहे.

Web Title: SIT asks Waghmare for an hour-long inquiry-search connection with the killers of Panesar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.