जोतिबा मंदिरात आज वैकुंठ चतुर्दशी निमित्त श्री जोतिबा देवाची श्री विष्णू रुपात महापूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:56 PM2018-11-22T12:56:19+5:302018-11-22T12:59:52+5:30

जोतिबा मंदिरात आज सकाळी..वैकुंठ चतुर्दशी निमित्त श्री . जोतिबा देवाची श्री विष्णू रुपात महापूजा बांधली . सकाळी वैकुंठ चतुर्दशी निमित्त बांधण्यात आलेल्या श्री .विष्णू रुपी  पूजेचे आध्यात्मिक महत्त्व असे की श्री .विष्णु नी सुदर्शन चक्र मिळविण्यासाठी

Shri Jyotiba, Lord Vishnu, Lord Mahapooja on the occasion of Vaikunth Chaturdi in Jyotiba temple. | जोतिबा मंदिरात आज वैकुंठ चतुर्दशी निमित्त श्री जोतिबा देवाची श्री विष्णू रुपात महापूजा

 वैकुंठ चतुर्दशी निमित्त दख्खनचा राजा श्री . जोतिबा देवाची बांधण्यात आलेली श्री .विष्णू रूपातील महापूजा                   छाया -मानव फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देगुलाल खोबऱ्यांची उधळण करून भाविकांनी चांगभलं चा गजर करेल.या त्रिपुरारी पौर्णिमेपासून सलग पाच पौर्णिमा करण्यास प्रारंभ करतात .रात्री ८ वाजता श्री जोतिबा देवाचा मंदिर प्रदक्षिणेसाठी पालखी सोहळा निघणार आहे ..

जोतिबा -ऑनलाईन लोकमत --जोतिबा मंदिरात आज सकाळी..वैकुंठ चतुर्दशी निमित्त श्री . जोतिबा देवाची श्री विष्णू रुपात महापूजा बांधली . सकाळी वैकुंठ चतुर्दशी निमित्त बांधण्यात आलेल्या श्री .विष्णू रुपी  पूजेचे आध्यात्मिक महत्त्व असे की श्री .विष्णु नी सुदर्शन चक्र मिळविण्यासाठी श्री . शिव शंकराची एक हजार एक कमोद कमळ वाहून पूजा करण्येचा संकल्प केला .

कमोद कमळ स्वर्गातून आणण्यास श्री . नारद मुनीला सांगितले . त्याप्रमाणे नारद मुनी नी एक हजार एक कमळ आणली . श्री .विष्णूनी शिवपूजेस सुरुवात केली . त्याच वेळी शिवभक्त शुक्राचार्य यांनी शंकराना विष्णूची परीक्षा घेण्यास सांगितले . त्याप्रमाणे शंकरानी नारदानी आणलेल्या एक हजार एक कमळा पैकी एक कमळ गुप्तपणे गायब केले .विष्णूनी चालू केलेल्या संकल्प पूजेमध्ये एक कमळ कमी पडले . तेव्हा विष्णूनी नारदाला एक कमळ घेऊन यायला सांगितले .

नारद स्वर्गात गेले तेव्हा स्वर्गातील सर्व कमळे गुप्त झाली होती . नारदानी ही सर्व हकीकत सांगितल्यावर श्री .विष्णूनी आपला डोळा दाखवून या डोळ्यास काय म्हणतात असा प्रश्न नारदाला केला तेव्हा नारद म्हणाले याला नेत्र कमळ म्हणतात . त्याच क्षणी विष्णूनी नी आपला डोळा काढला आणि शिवपूजेस नेत्र कमळ वाहून पूजा पूर्ण केली . श्री . शिवशंकर प्रकट झाले आणि महा सुदर्शन चक्र श्रीविष्णूला दिले . आशी अख्यायिका सांगितली जाते . त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त श्री . जोतिबा मंदिरात दीप प्रज्वलीत करून शिखरे पाजाळण्याचा उत्सव साजरा होईल. रात्री ८ वाजता श्री जोतिबा देवाचा मंदिर प्रदक्षिणेसाठी पालखी सोहळा निघणार आहे .. गुलाल खोबऱ्यांची उधळण करून भाविकांनी चांगभलं चा गजर करेल.या त्रिपुरारी पौर्णिमेपासून सलग पाच पौर्णिमा करण्यास प्रारंभ करतात .

 

Web Title: Shri Jyotiba, Lord Vishnu, Lord Mahapooja on the occasion of Vaikunth Chaturdi in Jyotiba temple.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.