Shocking Anabhaanav karavya, Kolhapur kapoori only broke hands, hands on two grandchildren | धक्कादायक ! आंघोळीवरुन वाद झाल्यानं सासऱ्याने कोयत्यानं तोडले सूनेचे हात, नातवांवरही केले सपासप वार
धक्कादायक ! आंघोळीवरुन वाद झाल्यानं सासऱ्याने कोयत्यानं तोडले सूनेचे हात, नातवांवरही केले सपासप वार

ठळक मुद्देआंघोळीच्या पाण्यावरुन वाददोन्ही नातवांवरही परळीचे वार सून शुभांगी हिचे दोन्ही हात तुटले

कोल्हापूर - आंघोळीच्या पाण्यावरुन झालेल्या वादातून सास-यानं सून आणि नातवांवर कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मल्हारपेठ सावर्डे येथील पन्हाळा तालुक्यातील गावात बुधवारी (14 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या वादातून सास-यानं चक्क आपल्या सूनेचे कोयत्याने हातच तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

आंघोळीच्या पाण्यावरुन झालेल्या वादातून सासऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले. यादरम्यान आईला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणा-या दोन्ही नातवांवरही त्याने कोयत्यानं वार केले. या घटने सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत.  जखमींना कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सूनेची प्रकृती गंभीर आहे.

मल्हारपेठ-सावर्डे या गावातील पांडुरंग दशरथ सातपुते (वय ६0) यांनी बुधवारी सकाळी आंघोळीसाठी प्रथम नंबर कुणाचा यावरुन वाद घालत सून शुभांगी रमेश सातपुते (वय ३0) हिच्यावर कोयत्यानं वार केला. यात तिचे दोन्ही हात तुटले. हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणा-या  मयुरेश (वय ९) आणि कनिष्क (वय ४) या दोन नातवांच्या डोक्यावरही पांडुरंग यांनी कोयत्यानं वार केल्याने ते जखमी झाले आहेत. या झटापटीत पांडुरंगदेखील जखमी झाले.

या चौघांनाही उपचारासाठी कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सून शुभांगी हिचे दोन्ही हात तुटले असल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. तिला शासकीय रुग्णालयातून खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. याबाबत कळे पोलीस ठाण्यात सासरे पांडुरंग सातपुते यांच्याविरोधात  गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.


Web Title: Shocking Anabhaanav karavya, Kolhapur kapoori only broke hands, hands on two grandchildren
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.