करवीरनगरीत शिवरायांचा जयघोष : शिवजयंतीनिमित्त पुतळ्याची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:42 AM2019-02-15T00:42:21+5:302019-02-15T00:43:23+5:30

शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘जय भवानी...’ अशा जयघोषात

Shivrajaya's victory over Karveeran: procession of Shiva Jayanti | करवीरनगरीत शिवरायांचा जयघोष : शिवजयंतीनिमित्त पुतळ्याची मिरवणूक

करवीरनगरीत शिवरायांचा जयघोष : शिवजयंतीनिमित्त पुतळ्याची मिरवणूक

Next
ठळक मुद्दे शिवाजी तरुण मंडळाचे आयोजन

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘जय भवानी...’ अशा जयघोषात परिसर दुमदुमून गेला.दुपारी बारा वाजता गंगावेश येथून या मिरवणुकीचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पापाची तिकटी, महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, कोठीशाळा, अर्धा शिवाजी पुतळा चौक
अशी मिरवणूक काढण्यात आली. तिचा समारोप उभा मारुती चौकात झाला.

यात माजी नगरसेवक पिंटू राऊत, सदाभाऊ शिर्के, सुरेश जरग, चंद्रकांत पाटील, लालासाहेब गायकवाड, उत्सव समितीचे अध्यक्ष योगेश इंगवले, अक्षय मोरे, अभिजित राऊत, गिरीश साळोखे, भानुदास इंगवले, सुरेश साळोखे, प्रियांका इंगवले, दीप्ती सावंत, गीता इंगवले, सानिका इंगवले, जयश्री राऊत, भाग्यश्री इंगवले, वैष्णवी इंगवले, सुप्रिया झेंडे, सुजाता मोरे, रेखा मोरे, सुनंदा चव्हाण, आक्काताई सरनाईक, वैशाली जाधव, सुजाता पोवार, नंदा नाईक, आदी शिवभक्त व कार्यकर्ते सहभागी झाले होते. जागोजागी अश्वारूढ पुतळ्यावर फुलांची उधळण करण्यात आली.

लक्षवेधी कमान
उभा मारुती चौकात ऐतिहासिक किल्ल्याची ३० फुटी काल्पनिक कमान उभी केली आहे; तर ४५ फुटी स्टेजवरही दोन्ही बाजूंना हत्ती आणि मधोमध शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात आला आहे. यावर विविध रंगांतील एलईडी लाईटचा प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यामुळे ही कमान व एकूणच येथील वातावरण उत्साही व लक्षवेधी ठरत आहे.
ही कमान व स्टेजवरील सजावट बाबासाहेब कांबळे यांनी केली आहे. याचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक डॉ. भारत खराटे, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवजयंती उत्सवानिमित्त कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळातर्फे गुरुवारी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली. यात शेकडो शिवभक्त सहभागी झाले होते.

Web Title: Shivrajaya's victory over Karveeran: procession of Shiva Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.