शिवाजी विद्यापीठ देणार ‘स्टार्टअप इंडिया’ला बळ, इन्क्युबेशन सेंटरला पाच कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 05:29 PM2018-10-04T17:29:45+5:302018-10-04T17:32:46+5:30

विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्य लोकांना त्यांचे अभिनव कल्पनांवर आधारित प्रस्ताव आता शिवाजी विद्यापीठाला सादर करता येणार आहेत. या प्रस्तावांद्वारे ‘शिवाजी सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अ‍ॅँड लिंकेजीस’(एससीआयआयएल) या केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठ ‘स्टार्टअप इंडिया’ला बळ देणार आहे.

Shivaji University gives 'Startup India' power | शिवाजी विद्यापीठ देणार ‘स्टार्टअप इंडिया’ला बळ, इन्क्युबेशन सेंटरला पाच कोटी मंजूर

मुंबईतील राजभवनमध्ये बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरचे इरादापत्र संचालक प्रा. डॉ. आर. के. कामत यांना प्रदान केले. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ देणार ‘स्टार्टअप इंडिया’ला बळइन्क्युबेशन सेंटरला पाच कोटी मंजूर राज्य शासनाकडून इरादापत्र प्रदान

कोल्हापूर : विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्य लोकांना त्यांचे अभिनव कल्पनांवर आधारित प्रस्ताव आता शिवाजी विद्यापीठाला सादर करता येणार आहेत. या प्रस्तावांद्वारे ‘शिवाजी सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अ‍ॅँड लिंकेजीस’(एससीआयआयएल) या केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठ ‘स्टार्टअप इंडिया’ला बळ देणार आहे.

या केंद्रासाठी राज्य शासनाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुंबई येथे राजभवनमध्ये बुधवारी (दि. ३) झालेल्या ‘स्टार्ट-अप इंडिया महाराष्ट्र यात्रा’ उपक्रमाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरचे संचालक प्रा. डॉ. आर. के. कामत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासनाच्या वतीने इरादापत्र (लेटर आॅफ इंटेंट) प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे प्रमुख उपस्थित होते.

विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. कामत यांनी सांगितले की, विद्यापीठाने या इन्क्युबेशन सेंटरसाठी समृद्धी इंडस्ट्रीजचे मनीष पाटील यांच्या सहकार्याने प्रस्ताव तयार करून शासनाला सादर केला होता. एकूण ११ कोटी रुपयांच्या या प्रस्तावापैकी पाच कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे.

राज्य शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीतर्फे ही मंजुरी दिली आहे. या केंद्राचे कामकाज विद्यापीठ आणि समृद्धी इंडस्ट्रीज यांच्यातर्फे होणार आहे. पाच वर्षांच्या या प्रकल्पांतर्गत वर्षाला १५ ते २० स्टार्टअप प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आहे.

यामध्ये विद्यार्थ्यांसह तळागाळातील संशोधक, सर्वसामान्य लोकांनाही आपल्या अभिनव कल्पनांवर आधारित प्रस्ताव सादर करता येऊ शकणार आहेत. त्यासाठी समृद्धी उद्योगाच्या सहकार्याने जुगाडफंडा डॉट कॉम हे पोर्टल सुरू केले आहे. सिंगापूरमधील आघाडीच्या विद्यापीठाच्या सहकार्याने प्रशिक्षण देण्यात आहे.


या इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटरचा विद्यापीठ परिक्षेत्रातील संशोधक विद्यार्थी आणि अभिनव, उपक्रमशील नागरिक यांना मोठा लाभ होईल.
- कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

साहाय्य करण्याचे धोरण

स्टार्टअप इंडिया महाराष्ट्र यात्रेद्वारे शासन गावोगावी उद्योगास चालना मिळण्यासाठी उद्योजक घडविण्याचा प्रयत्न करीत आहे. या अंतर्गत शिवाजी विद्यापीठातील इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक आणि नवउद्योजकांना साहाय्य करण्याचे धोरण असल्याचे प्रा. कामत यांनी सांगितले.

 

 

Web Title: Shivaji University gives 'Startup India' power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.