शिवप्रसादचा शैक्षणिक प्रवास खडतर-प्रदर्शनाच्या पैशांतून शिक्षण केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:09 AM2019-07-17T00:09:54+5:302019-07-17T00:10:34+5:30

‘पुराणतत्व’ या विषयाच्या पदवीधर शिक्षणासाठी अर्थिक कोंडमाऱ्याशी धडपडणाºया पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील शिवप्रसाद सुनील शेवाळे याचा शैक्षणिक प्रवास खडतर बनत आहे.

 Shiva Prasad's educational journey is difficult | शिवप्रसादचा शैक्षणिक प्रवास खडतर-प्रदर्शनाच्या पैशांतून शिक्षण केले

शिवप्रसादचा शैक्षणिक प्रवास खडतर-प्रदर्शनाच्या पैशांतून शिक्षण केले

Next
ठळक मुद्देएैतिहासिक पुराणतत्व पदव्युत्तर (एम. ए.) अभ्यासासाठी प्रवेशपात्र दोघांपैकी ‘शिव’च्या शिक्षणाचे भवितव्य अर्थिक पाठबळावर ठरणार.-दुशाळगडच्या पाऊलखुणाचा शोध

सरदार चौगुले ।
पोर्ले तर्फ ठाणे : ‘पुराणतत्व’ या विषयाच्या पदवीधर शिक्षणासाठी अर्थिक कोंडमाऱ्याशी धडपडणाºया पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील शिवप्रसाद सुनील शेवाळे याचा शैक्षणिक प्रवास खडतर बनत आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एैतिहासिक पुराणतत्व पदव्युत्तर (एम. ए.) अभ्यासासाठी प्रवेशपात्र दोघांपैकी ‘शिव’च्या शिक्षणाचे भवितव्य अर्थिक पाठबळावर ठरणार.

शेवाळे कुटुंबाच्या वाट्याला पोटापुरतीही शेती नसल्याने, आईला रोज एकाच्या बांधावर रोजगार करावा लागतो. त्यातून मिळणाºया पैशांतून घरखर्च चालवत त्यातल्याच पैशाला गाठीला गाठ करून, मारून शिवचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कारण वडील घर सोडून गेल्यामुळे घरची जबाबदारी आईने मनगटाच्या हिंमतीवर पेलली. तसे शिवचे बालपण आजोळी बाबंरवाडीत गेले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर शिवने पदवीपर्यंतचे शिक्षण स्वामी विवेकानंद कॉलेजमधून इतिहास विषयातून पूर्ण केले.

गडकोट किंवा पुराणतत्वातील एैतिहासिक घटना, पुरावे लोकांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी किंवा त्यांच्यातील बारकावे शोधण्यासाठी पुराणतत्व या विषयावर पदव्युत्तर शिक्षणाची गरज आहे; परंतु या शिक्षणासाठी घरची परिस्थिती अडथळा बनून येत आहे. पुणे येथील डेक्कन कॉलेजमध्ये अभ्यासक्रमासाठी साधारण तीन लाखांच्या आसपास खर्च येणार आहे. तो अर्थिक पाठबळाच्या आशेवर अवलंबून आहे.

दुशाळगडच्या पाऊलखुणाचा शोध
वाचणातून ऐतिहासिक विषयाबद्दल आकर्षण निर्माण झालेल्या शिवप्रसादने साखरप्याजवळ पौराणिक दुशाळगडच्या पाऊलखुणाचा शोध लावला. त्याला असणाºया गडकोटाच्या आकर्षणातून पानवेलीत झाकळलेला व दुर्लक्षित असणारा दुशाळगड लोकांच्या नजरेसमोर आणणे शक्य झाले. त्याला गडकोटाच्या बाह्यांगाची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचविण्याची प्रबळ महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी त्याला पुरातत्व पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे.

प्रदर्शनाच्या पैशांतून शिक्षण केले
शिवने आठवीत असताना पाच वर्षे दोन तासांची दीड हजार रुपये पगाराची माळ्याची नोकरी केली. पाचशे रुपये घरखर्चाला, बाकीच्या पैशात किल्ला बघणे, पुस्तके खरेदी करण्यासाठी वापरले. जुनी नाणी, शस्त्रे, दुर्मीळ पुस्तके जमा करून त्यांचे महाराष्ट्रात प्रर्दशन भरवून त्यातून मिळणाºया पैशातून पदवीचा शिक्षण खर्च भागविला; परंतु पदव्युत्तरचे शिक्षण शिवच्या आवाक्याबाहेरचा असल्याने त्यांची कसोटी लागणार आहे.

Web Title:  Shiva Prasad's educational journey is difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.