संजय मंडलिक यांचा लोकसभेसाठी प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:54 AM2018-06-22T00:54:30+5:302018-06-22T00:54:30+5:30

Sanjay Mandalik's publicity campaign | संजय मंडलिक यांचा लोकसभेसाठी प्रचार

संजय मंडलिक यांचा लोकसभेसाठी प्रचार

googlenewsNext


कोल्हापूर : आगामी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी म्हणून शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांनी पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतिक भवनात मेळावा घेऊन थेट प्रचारच सुरू केला. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला आशीर्वादाचे पाठबळ द्या, असे आवाहन त्यांनी या मेळाव्यात केले.
मेळाव्यास शिवसेनेचे पिंपरी-चिंचवडचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार प्रकाश आबीटकर, वीरेंद्र मंडलिक यांच्यासह पुण्यातील नोकरदार मंडळी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताकाला जावून मोगा लपविण्याची आपली पद्धत नसल्याचे सांगून मंडलिक यांनी आपण लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचे सांगितले. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेले योगदान कोणत्याच पिढीला विसरता येणार नाही. तो विकासाचा वारसा पुढे चालविण्यासाठीच मला संधी द्या, असे आवाहन मंडलिक यांनी केले.
आमदार आबिटकर म्हणाले,‘बाळासाहेब यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांचे व दिवंगत मंडलिक यांच्यानंतर संजय मंडलिक यांचे काय असे विचारणाऱ्यांना या दोघांनीही स्वकर्तृत्वातून उत्तर दिले आहे.’
यावेळी मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पक्षनेते राहुल कलाटे, कामगार सेनेचे जयसिंग पोवार, उद्योगपती लक्ष्मण टिकेकर, शिवाजी शिऊडकर, विश्वनाथ स्वामी, आदी उपस्थित होते.
जगदीश परीट यांनी स्वागत केले. पांडुरंग पाटील यांनी प्रास्ताविक केले. नामदेव शिंदे यांनी आभार मानले.
महाडिक यांचा खोटेपणा
देशभरातील ५४३ खासदारांमध्ये गेल्या चार वर्षांत सर्वाधिक २५५ वेळा संसदीय चर्चेत सहभाग घेतला. ९५३ प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे मीच ‘नंबर वन खासदार’ आहे.
इंटरनेटवर ‘डॉट इन लोकसभा’ या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध असून त्यातून खासदार धनंजय महाडिक यांचा खोटेपणा सिद्ध होईल,असा टोला खासदार श्रीरंग बारणे यांनी लगावला.

Web Title: Sanjay Mandalik's publicity campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.