कर्जमाफीचा जिल्ह्याला ६५० कोटींचा लाभ-- सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:49 AM2017-10-19T00:49:04+5:302017-10-19T00:52:25+5:30

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यात २ लाख ६२ हजार ४६७ अर्ज आॅनलाईनद्वारे प्राप्त झाले आहेत.

 Rs 650 crore benefits to the debt waiver district - Sadabhau Khot | कर्जमाफीचा जिल्ह्याला ६५० कोटींचा लाभ-- सदाभाऊ खोत

कर्जमाफीचा जिल्ह्याला ६५० कोटींचा लाभ-- सदाभाऊ खोत

Next
ठळक मुद्देलाभार्र्थी शेतकºयांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमउर्वरित ६६२ गावांत २५ आॅक्टोबरपर्यंत चावडी वाचन पूर्ण होईल

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यात २ लाख ६२ हजार ४६७ अर्ज आॅनलाईनद्वारे प्राप्त झाले आहेत. यामधून थकबाकीदार शेतकºयांना २२३ कोटी रुपये, नियमित कर्ज भरणाºयांना ३६१ कोटी रुपये व राष्टÑीयीकृत
बॅँकेतून कर्ज घेतलेल्यांना ६५ कोटी असा एकूण सुमारे ६५० कोटी रुपये लाभ मिळणार आहे, अशी माहिती कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी येथे दिली. त्याचबरोबर फक्त कर्जमाफी न करता शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही, यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ अंतर्गत लाभार्र्थी शेतकºयांना कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमात मंत्री खोत यांच्या हस्ते जिल्ह्यातील २५ लाभार्र्थी शेतकरी दाम्पत्यांचा कर्जमाफीचे प्रमाणपत्र, साडी-चोळी व पेहराव देऊन प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला.

मंत्री खोत म्हणाले, गतवेळी दिलेल्या कर्जमाफीत राहिलेल्या त्रुटी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी दक्षता घेतली आहे. सरसकट दीड लाखापर्यंतचे कृषी कर्ज माफ करून शेतकºयाला सन्मानित करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत शेतकºयांना सन्मानित करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये यासाठी शासन विविध योजना राबवीत आहे. जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, जिल्ह्यातील ३९१ ग्रामपंचायतींमध्ये कर्जमाफीच्या यादींचे चावडीवाचन झाले असून, उर्वरित ६६२ गावांत २५ आॅक्टोबरपर्यंत चावडी वाचन पूर्ण होईल.

सन्मानित केलेले शेतकरी
शामराव शिवाप्पा गेड्डी, रामचंद्र मल्लाप्पा हासुरी, इंदुबाई वसंतराव दणाणे, बाळासाहेब अण्णा कासार, संतान डुमिंग फर्नांडिस, धोंडिबा लक्ष्मण पाटील, मारुती बैजू राजगोळकर, संजय शंकर सोनुले, सुधाकर दिनकर जाधव, धोंडिबा शंकर कांबळे, दिनकर बाळू तारळेकर, विश्वनाथ हैबती गायकवाड, बंडा आबा कुंभार, संभाजी राऊ सुतार, सदाशिव भाऊ कांबळे, महेश बापू गावडे, नंदकुमार धोंडिबा दळवी, शामराव ईश्वरा पाटील, सुभाष सिंधू बेबाजे, संजय केरबा माने, संजय पांडुरंग गवंडी, विठ्ठल ज्ञानू दाबोळे, तुकाराम गोविंद कुरणे, आनंदा हिंदुराव चौगुले-जाधव

जिल्हास्तरावर समिती स्थापन करणार
आॅनलाईन अर्ज व त्यांची छाननी, याद्या तयार करणे, योजनेच्या अंमलबजावणीची व्यापक प्रसिद्धी करणे यासाठी जिल्हास्तरावर व उपविभागीय स्तरावर समिती स्थापन करण्यात येत असून, नियमित कर्जदारांच्या खात्यावरही लवकरच प्रोत्साहन रक्कम जमा करण्यात येईल, असे खोत यांनी सांगितले.

अडीच लाख सभासदांची माहिती अपलोड
शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २,७०,५९० अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हा मध्यवर्र्ती बँकांमधील ५३,२६२ थकबाकीदार असून, २२३ कोटी १७ लाख रुपये थकबाकीची रक्कम आहे, तर राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण बँकांमधील ५४,७२९ थकबाकीदार असून, थकबाकीची रक्कम ६५ कोटी १३ लाख आहे. जिल्ह्यातील एकूण पात्र १८४८ सेवा संस्थांमधील २,५२,९७० सभासदांची माहिती अपलोड करण्यात आली आहे.

Web Title:  Rs 650 crore benefits to the debt waiver district - Sadabhau Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.