अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर ‘अग्निशमन’ची जोखीम-कोल्हापूर महापालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:33 AM2018-10-26T00:33:46+5:302018-10-26T00:35:31+5:30

स्वत:चा जीव धोक्यात घालून अहोरात्र, प्रामाणिकपणे सेवा बजावणाºया महापालिकेच्या अग्निशमन दलातील कर्मचारी अपुऱ्या संख्याबळावर जोखीम पत्करत आहेत.

Risk of 'Fire Fighting' on Insufficient Employees- Kolhapur Municipal Corporation | अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर ‘अग्निशमन’ची जोखीम-कोल्हापूर महापालिका

अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर ‘अग्निशमन’ची जोखीम-कोल्हापूर महापालिका

googlenewsNext
ठळक मुद्दे कोणत्याही घटनेत जीवितहानी, नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत अग्निशमन दल अहोरात्र सेवा देते.

तानाजी पोवार ।
कोल्हापूर : स्वत:चा जीव धोक्यात घालून अहोरात्र, प्रामाणिकपणे सेवा बजावणाºया महापालिकेच्या अग्निशमन दलातील कर्मचारी अपुऱ्या संख्याबळावर जोखीम पत्करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या एकूण १८२ पदांपैकी सुमारे ११२ पदे रिक्त आहेत. त्यातच सुमारे ६० कर्मचारी ठोक मानधनावर घेऊन मलमपट्टी करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. फोन खणखणला की कोणताही विचार न करता आवश्यक साधनसामग्रीसह घटनास्थळी वेळेत पोहोचून समोरील धोक्याचा सामना करणे, हेच या दलाचे ध्येय.

कोल्हापूर महानगरपालिकेची संपूर्ण शहरामध्ये सहा ठिकाणी अग्निशमन केंद्रे आहेत. त्यामध्ये सहा फायर फायटरसह चार वेगवेगळ्या ठिकाणी चार फायर बुलेटची सुविधा उपलब्ध आहे. महापालिकेतील हा विभाग ‘जोखीम अंगावर घेऊन सेवा बजावणारा’ म्हणून ओळखला जातो; पण या विभागातील ठोक मानधनावरील कर्मचाºयांची सेवा मात्र जिवावर उदार होऊन आहे.

घराला आग लागलेली असो, पाण्यात बुडणारा असो, अगर विजेच्या तारेवर अडकलेला पक्षी असो, कोणत्याही घटनेत जीवितहानी, नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत अग्निशमन दल अहोरात्र सेवा देते.
विभागात कर्मचाºयांची एकूण १८२ मंजूर पदे आहेत; पण त्यापैकी फक्त ७० कर्मचारीच कायम आहेत, तर ११२ कर्मचाºयांच्या जागा गेली १0 वर्षे रिक्त आहेत. फायरमनच्या ६१ रिक्त जागेवर ४१ कर्मचारी तोकड्या ठोक मानधनावर नऊ वर्षे कार्यरत आहेत. निवृत्त जागा भरल्याच जात नाहीत.

ठोक मानधन कर्मचारी असुरक्षित
ठोक मानधनावर २०१२ मध्ये भरती केलेले सुमारे ६२ कर्मचारीही कायम सेवेतील कर्मचाºयांप्रमाणेच जिवावर उदार होऊन सेवा बजावतात. सुविधा देताना मात्र त्यांच्यात दुजाभाव आहे. त्यांना स्वखर्चाने गमबूट, गणवेश, रेनकोट, आदी साहित्य घ्यावे लागते. तसेच सुरक्षा विमाही नाही.

अ. पदाचे नाव मंजूर कार्यरत रिक्त
नं. पदे पदे पदे
१ मुख्य अग्निशमन ०१ ०० ०१
अधिकारी
२ उपमुख्य अग्निशमन ०१ ०१ ००
अधिकारी
३ स्थानक अधिकारी ०३ ०२ ०१
४ लिपिक ०१ ०१ ००
५ वाहनचालक ३२ १३ १९
६ टेक्निकल इंस्ट्रक्टर ०१ ०० ०१
७ तांडेल २१ ०२ १९
८ फायरमन १०८ ४७ ६२
९ अटेंडंट १४ ०४ १०

फायर स्टेशन : ताराराणी चौक, लक्ष्मीपुरी (कांदा - बटाटा मार्केट), कसबा बावडा, टिंबर मार्केट, फुलेवाडी, शास्त्रीनगर-प्रतिभानगर.
१ रेस्क्यू व्हॅन, ४ फायर बुलेट
चार शववाहिकांचाही भार अग्निशमन दलावरच.
नवीन मंजूर फायर स्टेशन : साकोली कॉर्नर (शिवाजी पेठ) व नवीन वाशी नाका; पण कर्मचारी संख्या अपुरी असल्यामुळे मंजूर फायर स्टेशन विस्मरणात गेली आहेत.
 

अपुऱ्या कर्मचाऱ्यांबाबत आयुक्तांकडे अहवाल पाठवला आहे. चालक कमी असल्याने त्या ठिकाणी खासगी कंपनीकडून भरती सुरूआहे, तर इतर भरतीबाबतची प्रक्रिया लवकरच होईल.

- रणजित चिले, प्र. मुख्य अधिकारी, अग्निशमन दल, को.म.न.पा.

Web Title: Risk of 'Fire Fighting' on Insufficient Employees- Kolhapur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.