उठाबशा प्रकरणी केईएम रुग्णालयात विजयाचा उपचाराला प्रतिसाद, प्रकृतीत ८0 टक्के सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 05:29 PM2017-12-16T17:29:39+5:302017-12-16T17:39:20+5:30

गृहपाठ केला नाही म्हणून ३00 उठाबशा काढणारी विद्यार्थिनी विजया निवृत्ती चौगुले हिच्या प्रकृतीत ८0 टक्के सुधारणा झाल्याची माहिती भाजपच्या वैद्यकीय विभागाचे विजय जाधव यांनी दिली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार विजया चौगुले हिच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Responding to the treatment of victory in KEM hospital in the wake of lethargy, in nature, up to 80% improvement | उठाबशा प्रकरणी केईएम रुग्णालयात विजयाचा उपचाराला प्रतिसाद, प्रकृतीत ८0 टक्के सुधारणा

उठाबशा प्रकरणी केईएम रुग्णालयात विजयाचा उपचाराला प्रतिसाद, प्रकृतीत ८0 टक्के सुधारणा

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रकांतदादा केईएम रुग्णालयात आज विजयाच्या प्रकृतीची चौकशी करणारविजयाच्या प्रकृतीत ८0 टक्के सुधारणा, उपचाराला प्रतिसाद

कोल्हापूर/मुंबई : गृहपाठ केला नाही म्हणून ३00 उठाबशा काढणारी विद्यार्थिनी विजया निवृत्ती चौगुले हिच्या प्रकृतीत ८0 टक्के सुधारणा झाल्याची माहिती भाजपच्या वैद्यकीय विभागाचे विजय जाधव यांनी दिली.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार विजया चौगुले हिच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रुक या भावेश्वरी संदेश विदयालयातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विजया चौगुले या विद्यार्थिनीला ५00 उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्यानंतर त्या विद्याथ्यीर्नीची प्रकृती बिघडली होती.

कोल्हापूरात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात तिला यापूर्वी दाखल करण्यात आले होते, परंतु तिच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नव्हती. काल तिला कोल्हापूरहून मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, उठाबशाची शिक्षा देणा-या शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी देवणला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, आज केईएम रुग्णालयात जाऊन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विजयाच्या प्रकृतीची चौकशी केली. विजयावरील उपचार मोफत करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

विजयावर उपचार करणारे न्यूरॉलॉजिस्ट डॉ. संगिता रावत आणि डॉ. प्रविण बांगर यांनी शनिवारी दुपारी माहिती दिली, की विजयाच्या प्रकृतीत ८0 टक्के सुधारणा झालेली आहे. ती उपचाराला प्रतिसाद देत असल्यामुळे मंगळवारपर्यंत ती बरी होउ शकेल.

दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आज रात्री ११ वाजता केईएम रुग्णालयात जाउन विजयाच्या प्रकृतीची आणि तिच्यावर चाललेल्या उपचाराविषयी माहिती घेणार आहेत.
 

Web Title: Responding to the treatment of victory in KEM hospital in the wake of lethargy, in nature, up to 80% improvement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.