भारत केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या रेश्मा मानेला कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 01:29 PM2019-01-29T13:29:14+5:302019-01-29T13:32:26+5:30

हल्याळ (कर्नाटक) येथे झालेल्या भारत केसरी कुस्ती स्पर्धेत आंतरराष्ट्रीय महीला कुस्तीगीर रेश्मा माने हिने कोल्हापूरच्याच स्वाती शिंदे हिचा तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ढाक डावावर चितपट करीत स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले.

Reshma Maneela Bronze of Kolhapur in India Kesari Tournament | भारत केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या रेश्मा मानेला कांस्य

भारत केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या रेश्मा मानेला कांस्य

googlenewsNext
ठळक मुद्देभारत केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या रेश्मा मानेला कांस्यकोल्हापूरच्याच स्वाती शिंदेला ढाक डावावर चितपट

कोल्हापूर : हल्याळ (कर्नाटक) येथे झालेल्या भारत केसरी कुस्ती स्पर्धेत आंतरराष्ट्रीय महीला कुस्तीगीर रेश्मा माने हिने कोल्हापूरच्याच स्वाती शिंदे हिचा तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ढाक डावावर चितपट करीत स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले.

रेश्माने पहिल्या फेरीत कर्नाटकच्या प्रियंकाला अवघ्या काही सेकंदात चितपट केले. दुसºया फेरीत पिंकी (हरियाणा) हिला ही चितपट केले. पिंकीने आशियाई कुस्ती स्पर्धेत व वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद पटकाविले होते. तर पुढील फेरीत हरियाणाच्याच निकी हिला निकराची झुंज दिली. त्यात तिला पहिल्या फेरीत २ गुणांची बढत मिळाली.

त्यानंतर निकीने बोजा टाकून ६ गुणांची कमाई करीत मात केली. या फेरीनंतर तिसऱ्या क्रमांकासाठी आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर मुरगुडच्या स्वाती शिंदे हिच्याबरोबर रेश्माची लढत झाली. यात रेश्माने स्वातीला ढाक डावावर चितपट करीत कांस्य पदकाची कमार्ई केली.

 

Web Title: Reshma Maneela Bronze of Kolhapur in India Kesari Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.