अंबाईवाडीच्या १८ कुटुंबांचे पुनर्वसन : दरडी कोसळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:56 AM2018-06-24T00:56:23+5:302018-06-24T00:56:39+5:30

Rehabilitation of 18 families of Ambawadi: The possibility of collapsing | अंबाईवाडीच्या १८ कुटुंबांचे पुनर्वसन : दरडी कोसळण्याची शक्यता

अंबाईवाडीच्या १८ कुटुंबांचे पुनर्वसन : दरडी कोसळण्याची शक्यता

Next

प्रविण देसाई ।
कोल्हापूर : सन २०१४ मध्ये घडलेल्या माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दक्ष असलेल्या जिल्हा प्रशासनाने शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी अंबाईवाडीचे मूळ गावातच सुरक्षित ठिकाणी दोन एकर जागेवर पुनर्वसन केले आहे. येथील १८ कुटुंबांना जागेचा ताबाही देण्यात आला. जिल्ह्यात भूस्खलन धोक्याच्या यादीत १९ गावे असून, त्यांच्याही पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे.

जुलै २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यात माळीणची दुर्घटना घडली होती. दरड कोसळून यामध्ये जीवितहानी झाली हाती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने भूस्खलन, तसेच दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या गावांची यादी तयार केली आहे. त्यानुसार या गावांतील कुटुंबांचे स्थलांतर करून त्यांच्या पुनर्वसनाचीही प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक धोका असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी अंबाईवाडी या डोंगरावरील वाडीचे दीड किलोमीटर अंतरावर उखळू गावातच सुरक्षित ठिकाणी जिल्हा प्रशासनाने दोन एकर जागा देऊन पुनर्वसन केले आहे.

या वाडीचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या गावाचा संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून सर्व्हेही केला होता. पावसाळ्यात दरड कोसळण्याचा, भूस्खलनाचा सर्वाधिक धोका या गावाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी १५ जूनला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत या गावाचे तातडीने पुनर्वसन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदारांनी ४ जूनला या १८ कुटुंबांना जागेची मोजणी करून व सात-बारा नावावर करून जागेचा ताबा दिला.

भूस्खलनाच्या धोक्याची गावे
राधानगरी तालुक्यातील कुऱ्हाडवाडी, ऐनीपैकी धरमलेवाडी, ऐनीपैकी भैरी धनगरवाडा, कासारवाडापैकी धनगरवाडा, धामणवाडीपैकी हणबरवाडी, धामणवाडीपैकी अवचितवाडी, पंडेवाडी, पाटपन्हाळा, सोळांकूर-रामनगर या गावांसह भुदरगड तालुक्यातील पडखंबेपैकी खोतवाडी, पडखंबेपैकी रावणवाडी, वासनोलीपैकी धनगरवाडा, वासनोलीपैकी जोगेवाडी, कारिवडेपैकी हाणफोडेवाडी, टिक्केवाडी, गडहिंग्लज तालुक्यातील चिंचेवाडी (सामानगडाच्या पायथ्याशी), पन्हाळा तालुक्यातील मराठवाडी, शाहूवाडी तालुक्यात उखळूपैकी अंबाईवाडी या गावांचा भूस्खलनाच्या धोक्याच्या यादीत समावेश आहे.
 

भूस्खलनाचा व दरड कोसळण्याचा धोका असलेल्या उखळूपैकी अंबाईवाडी या गावाचे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुनर्वसन केले आहे. जिल्हा प्रशासनाने येथील १८ कुटुंबांना जमीन देऊन त्यावर प्लॉट पाडून त्यांच्या ताब्यात दिले आहेत.
- अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

Web Title: Rehabilitation of 18 families of Ambawadi: The possibility of collapsing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.