सदरबाजारमध्ये दोन गटांत राडा; ६ जखमी-दगडफेक, तलवार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 01:37 AM2019-05-08T01:37:06+5:302019-05-08T01:39:43+5:30

कोल्हापूर : लहान मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या वादातून सदरबाजार येथे मंगळवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास दोन गटांमध्ये मोठी दगडफेक झाली. त्यामध्ये ...

Rada in two groups in the market; 6 injured, stone attack | सदरबाजारमध्ये दोन गटांत राडा; ६ जखमी-दगडफेक, तलवार हल्ला

सदरबाजारमध्ये दोन गटांत राडा; ६ जखमी-दगडफेक, तलवार हल्ला

Next

कोल्हापूर : लहान मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या वादातून सदरबाजार येथे मंगळवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास दोन गटांमध्ये मोठी दगडफेक झाली. त्यामध्ये दोन्ही गटांतील सहाजण जखमी झाले. आरिफ नजीर बेपारी (वय ३४), हामीद अल्लाबक्ष बेपारी (५०), अजहर दस्तगीर फकीर (४६), अयाज दस्तगीर फकीर (५२), आसिफ फकीर (४५) आणि इर्शाद निसार शेख (२७, सर्व रा. सदरबाजार) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकारामुळे सदरबाजार परिसरात तणाव निर्माण झाला. घटनास्थळी शाहूपुरी पोलिसांनी धाव घेऊन जमाव पांगविले आणि वातावरण निवळले.

सदरबाजार येथील अय्याज फकीर आणि मुन्ना बेपारी या दोन गटांत पूर्ववैमनस्य आहे. मंगळवारी रात्री लहान मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या भांडणातून सदर बाजार येथील भंडारे चौकात दोन्ही गटांत दगड, बाटल्यांची फेकाफेकी सुरू झाली. काहीवेळातच त्याचे पर्यवसान दोन्ही गटांतील हाणामारीमध्ये झाले. त्यात तलवारी, हॉकीच्या स्टिक, लोखंडी गज यांचा वापर करण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत त्या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या रुग्णालयाच्या परिसरात दोन्ही गटांचे समर्थक थांबून होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. या ठिकाणी शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम शाहूपुरी पोलीस ठाण्यात सुरू होते.

या दगडफेक, हाणामारीची माहिती समजताच घटनास्थळी शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगविण्यास सुरुवात केली. जलद प्रतिसाद पथक, राईट कंट्रोल पोलीस पथकाच्या मदतीने वातावरण निवळले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक
तिरूपती काकडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत त्या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या रुग्णालयाच्या परिसरात दोन्ही गटांचे समर्थक थांबून होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. या ठिकाणी करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम शाहूपुरी पोलीस ठाण्यात सुरू होते.


रस्त्यांवर दगड, बाटल्यांचा खच
या भंडारे चौकातील रस्त्यांवर दगड आणि बाटल्यांचा खच पडला होता. घटनास्थळी पोलिसांना बाटल्यांनी भरविलेली पोती मिळाली. दगडफेकीचा प्रकार झालेल्या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.


 

Web Title: Rada in two groups in the market; 6 injured, stone attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.