प्रदूषणप्रश्नी अधिकारी धारेवर-

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:01 AM2017-10-28T01:01:55+5:302017-10-28T01:05:15+5:30

कोल्हापूर : पंचगंगा नदीत थेट मैलामिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने शुक्रवारी झालेल्या महानगरपालिका स्थायी समिती सभेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना धारेवर धरण्यात आले.

Pollution officer Dharewar- | प्रदूषणप्रश्नी अधिकारी धारेवर-

प्रदूषणप्रश्नी अधिकारी धारेवर-

Next
ठळक मुद्देस्थायी समिती सभासांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यास विलंबाबत सदस्यांची विचारणाजयंती नाल्याजवळील फुटलेल्या पाईपचे दुरुस्तीचे काय झाले, अशी विचारणा

कोल्हापूर : पंचगंगा नदीत थेट मैलामिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने शुक्रवारी झालेल्या महानगरपालिका स्थायी समिती सभेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना धारेवर धरण्यात आले. तुटलेली पाईपलाईन जोडून पूर्ववत सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यास का विलंब लावला जात आहे, अशी विचारणाही सदस्यांनी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संदीप नेजदार होते.

पंचगंगा प्रदूषणाबाबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून प्रदूषणाची काय वस्तुस्थिती आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्राची तपासणी करताना महानगरपालिकेचे अधिकारी का उपस्थित नव्हते. जयंती नाल्याजवळील फुटलेल्या पाईपचे दुरुस्तीचे काय झाले, अशी विचारणा सभापती नेजदार, सत्यजित कदम यांच्याकडून करण्यात आली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी प्रक्रिया केंद्राची तपासणी करताना महापालिकेस कोणतीही सूचना दिलेली नव्हती, असा खुलासा अधिकाºयांनी यावेळी केला. १३ सप्टेंबर रोजी सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटली. त्याच्या दुसºया दिवशी वालचंद कॉलेजकडून पाहणी केली. त्याच्या दुरुस्तीकरिता २८ लाखांची निविदा प्रसिद्ध केली. पहिली मुदतवाढ दिली असून पुढील आठवड्यात काम
सुरू केले जाईल, असेही सांगण्यात आले.गाडीअड्ड्यातील ज्या लोकांना पर्यायी जागा दिली त्यांच्याव्यतिरिक्त सर्व जागा तीर्थक्षेत्र आराखडा अंतिम मंजुरीपूर्वी खाली करून घ्यावी, अशी सूचना दिलीप पोवार यांनी केली.

१८० टन कचरा विल्हेवाटीचे काम प्रगतिपथावर
कचरा टाकण्याची पर्यायी व्यवस्था काय केली. कोंडाळे भरून वाहतात. ‘झूम’वर कचरा टाकण्यास विरोध आहे. दोन दिवस गाड्या अडवल्या आहेत, अशी विचारणा दिलीप पोवार यांनी केली. त्यावर शहरातील१८० टन कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभे करण्याचे नियोजन आहे.
यापैकी रविवारी ५ टनाचा बायोगॅस प्रकल्प सुरू होईल. आणखी तीन ठिकाणी ५ टनाचे प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. तसेच भाजी मार्केटचा जवळपास १० टन कचरा या बायोगॅस प्रकल्पामध्ये घेतल्यास ३० टन कचºयाच्या विल्हेवाटीचा प्रश्न सुटणार आहे. रोकेम कंपनीकडून १८० टन कचरा विल्हेवाटीचे काम प्रगतीपथावर आहे, असे प्रशासनाने सांगितले.

Web Title: Pollution officer Dharewar-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.