कोल्हापूर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:21 AM2017-10-25T11:21:48+5:302017-10-25T11:31:44+5:30

आरक्षणावरील हरकतींमुळे व फेरआरक्षणासह इतर तांत्रिक अडचणींमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या जिल्ह्यातील कळंबे तर्फ ठाणे, वरणगे, वळिवडे (ता. करवीर) व अब्दुललाट, लाटवाडी (ता. शिरोळ) या पाच ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. २७) मतदान होत आहे. शनिवारी (दि. २८) मतमोजणी होणार आहे.

Polling on Friday for five Gram Panchayats in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान

googlenewsNext
ठळक मुद्देकळंबे तर्फ ठाणे, वरणगे, वळिवडे अब्दुललाट, लाटवाडी यांचा समावेशग्रामपंचायत क्षेत्रात स्थानिक सुटी जाहीरजाहीर प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी संपणार

कोल्हापूर , दि. २५ : आरक्षणावरील हरकतींमुळे व फेरआरक्षणासह इतर तांत्रिक अडचणींमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या जिल्ह्यातील कळंबे तर्फ ठाणे, वरणगे, वळिवडे (ता. करवीर) व अब्दुललाट, लाटवाडी (ता. शिरोळ) या पाच ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. २७) मतदान होत आहे. शनिवारी (दि. २८) मतमोजणी होणार आहे.


जिल्ह्यातील ४३५ ग्रामपंचायतींसाठी १६ आॅक्टोबरला मतदान झाले. याबरोबरच वरील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार होत्या; परंतु आरक्षणावरील हरकतींमुळे फेरआरक्षणासह इतर तांत्रिक अडचणींमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने याचा स्वतंत्र निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. शुक्रवारी (दि. २७) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. जाहीर प्रचाराची रणधुमाळी आज, बुधवारी सायंकाळी संपणार आहे.


या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी निवडणूक क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांना, कामगारांना या दिवशी भरपगारी स्थानिक सुटी जाहीर केली आहे.
 

 

 

Web Title: Polling on Friday for five Gram Panchayats in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.