कोल्हापुरात ‘पिंकथॉन वूमन रन ’ उत्साहात, अडीशेहून अधिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:01 AM2018-10-22T11:01:13+5:302018-10-22T11:03:04+5:30

अभिनेता व फिटनेस गुरू मिलिंद सोमण यांनी दोन वर्षांपूर्वी ‘पिंकथॉन गु्रप’ची स्थापना केली. हा गु्रप महिलांच्या आरोग्यासाठी देशभर कार्यरत आहे. त्याच्या वर्धापनदिनानिमित्त ‘पिंकथॉन कोल्हापूर चॅप्टर’तर्फे रविवारी सकाळी शिवाजी विद्यापीठ परिसरात आयोजित केलेल्या ‘पिंकथॉन वुमेन रन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात २५० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवत स्पर्धा पूर्ण केली.

'Pinchthon Woman Run' in Kolhapur, Spontaneous Participation of more than 200 women | कोल्हापुरात ‘पिंकथॉन वूमन रन ’ उत्साहात, अडीशेहून अधिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

 कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ परिसरात  पिंकथॉन कोल्हापूर चॅप्टरतर्फे आयोजित केलेल्या वुमन रनच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, विश्वविजय खानविलकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देकोल्हापुरात ‘पिंकथॉन वूमन रन ’ उत्साहातअडीशेहून अधिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

कोल्हापूर : अभिनेता व फिटनेस गुरू मिलिंद सोमण यांनी दोन वर्षांपूर्वी ‘पिंकथॉन गु्रप’ची स्थापना केली. हा गु्रप महिलांच्या आरोग्यासाठी देशभर कार्यरत आहे. त्याच्या वर्धापनदिनानिमित्त ‘पिंकथॉन कोल्हापूर चॅप्टर’तर्फे शिवाजी विद्यापीठ परिसरात आयोजित केलेल्या ‘पिंकथॉन वुमेन रन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात २५० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवत स्पर्धा पूर्ण केली.

या स्पर्धेेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते झाले. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाने तंदुरुस्त असणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी योगा, पोहणे, धावणे या क्रीडाप्रकारांसह संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. याबाबत आयर्नमॅन मिलिंद सोमण, अजित पाठक, वैष्णवी नायक यांनी पिंकथॉन या नावाने महिलांसाठी गु्रप बनविला.

या गु्रपच्या वतीने संपूर्ण देशातील महिला वर्गासाठी धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते. रविवारी सकाळी शिवाजी विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानुसार दोन, तीन व पाच किलोमीटर अशा विविध टप्प्यांत ही स्पर्धा घेण्यात आली.

यात अडीचशेहून अधिक महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी मधुरिमाराजे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर, विश्वविजय खानविलकर, सागर लालवाणी, केदार हसबनीस, सुरेश चेचर, दीपक पाटील, अक्षय नागवेकर, शीतल संघवी, आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेसाठी आरती संघवी, गीता लालवाणी, सुमित्रा खानविलकर, वैशाली संघवी, मंजिरी हसबनीस, रूपाली नांगरे-पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

Web Title: 'Pinchthon Woman Run' in Kolhapur, Spontaneous Participation of more than 200 women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.