निवृत्ती वेतन तत्काळ देण्यात यावे अन्यथा उपोषण, विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 04:54 PM2019-06-17T16:54:07+5:302019-06-17T16:55:48+5:30

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सुमारे २0 हून अधिक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होऊनसुद्धा तांत्रिक कारणास्तव गेले पाच वर्षांपासून सेवानिवृत्त वेतन व ...

Pensions should be given immediately, otherwise the fasting, decision of retired employees of the university | निवृत्ती वेतन तत्काळ देण्यात यावे अन्यथा उपोषण, विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा निर्णय

 शिवाजी विद्यापीठाच्या सेवक संघाच्या कार्यालयात सोमवारी सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांच्या बैठकीत बोलताना एस. एस. खानविलकर.

googlenewsNext
ठळक मुद्देनिवृत्ती वेतन तत्काळ देण्यात यावे अन्यथा उपोषणविद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा निर्णय

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सुमारे २0 हून अधिक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होऊनसुद्धा तांत्रिक कारणास्तव गेले पाच वर्षांपासून सेवानिवृत्त वेतन व अनुषंगिक लाभ मिळालेला नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा कोणीही दखल घेत नसल्याने संबंधित सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांच्या वतीने उपोषणाला बसण्याचा निर्णय, सोमवारी झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

शिवाजी विद्यापीठाच्या सेवक संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलताना एस. एस. खानविलकर म्हणाल्या, सेवानिवृत्ती वेतन न मिळाल्याने आमच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा, औषधोपचार, मुलीचे लग्नकार्य, शिक्षणामध्ये आर्थिक कोंडी होऊन दयनीय अवस्था झाली आहे. याबाबत सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार व पाठपुरावा करूनसुद्धा अद्याप आम्हाला सेवानिवृत्ती वेतन व अनुषंगिक लाभ देण्यात आलेला नाही.

आर. एम. शिंदे, बी. एम. परीट यांनी मनोगत व्यक्त केले, याप्रसंगी एल. आर. मोहिते, आर. आर. राणे, एस. एम. पाटील, यु. एम. रायबागकर, यु. ए. कदम, बी. एम. मोहिते, एस. जी. भोसले, के. डी. माने, एस. के. माने, एस. एस. पोवार, ए. डी. पंडित, ए. ए. गुप्ता, व्ही. आर. पाटील, यु. जी. करवडे, एस. बी. कातवरे, एम. एम. नेटके, बी. जी. शेंडे, आदी उपस्थित होते.

 

 

Web Title: Pensions should be given immediately, otherwise the fasting, decision of retired employees of the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.