आणीबाणीतील ५८ सत्याग्रहींना मिळणार पेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:10 AM2019-01-19T11:10:27+5:302019-01-19T11:11:33+5:30

आणीबाणीच्या लढ्यातील सत्याग्रहींना पेन्शन देण्याची ५८ प्रकरणे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंजूर केली आहेत. पेन्शनसाठी दर महिन्याला साडेतीन लाख रुपयांचा निधी आवश्यक असून, त्या स्वरूपाचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे.

Pension will get pension for 58 Satyagriha | आणीबाणीतील ५८ सत्याग्रहींना मिळणार पेन्शन

आणीबाणीतील ५८ सत्याग्रहींना मिळणार पेन्शन

Next
ठळक मुद्देआणीबाणीतील ५८ सत्याग्रहींना मिळणार पेन्शनजिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकरणे मंजूर : शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविला

कोल्हापूर : आणीबाणीच्या लढ्यातील सत्याग्रहींना पेन्शन देण्याची ५८ प्रकरणे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंजूर केली आहेत. पेन्शनसाठी दर महिन्याला साडेतीन लाख रुपयांचा निधी आवश्यक असून, त्या स्वरूपाचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे.

आणीबाणीच्या लढ्यातील सत्याग्रहींना व त्यांच्या कुटुंबांना पेन्शन मिळावी या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सत्याग्रहींसाठी त्यांच्या कुटुंबीयांचा लढा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्ह्यातून १०५ अर्ज आले होते. त्यामधील निकषामध्ये बसणारी ५८ प्रकरणे जिल्हाधिकाºयांनी मंजूर केली आहेत.

आणीबाणीमध्ये एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या सत्याग्रहींना १० हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यांचा मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पत्नीला पाच हजार रुपये पेन्शन मिळेल. तसेच एक महिन्यापेक्षा कमी कारावास झालेल्या सत्याग्रहींना पाच हजार रुपये व त्यांचा मृत्यू झाला असल्यास पत्नीस अडीच हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.

जिल्ह्यातील ५८ पेन्शनधारकांसाठी महिन्याला सुमारे साडेतीन लाख रुपयांची गरज आहे. हा निधी मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर होऊन पुढील महिन्यापासून ही पेन्शन लाभार्थ्यांना मिळेल, यादृष्टीने पाठपुरावा सुरू आहे.
 

 

Web Title: Pension will get pension for 58 Satyagriha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.