‘पीबीए’ वाणिज्य शाखेतील उत्कृष्ट करिअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 11:59 PM2018-06-24T23:59:22+5:302018-06-24T23:59:26+5:30

'PBA' excellent career in commerce | ‘पीबीए’ वाणिज्य शाखेतील उत्कृष्ट करिअर

‘पीबीए’ वाणिज्य शाखेतील उत्कृष्ट करिअर

googlenewsNext


कोल्हापूर : वाणिज्य शाखा आता केवळ बँकेच्या सेवेपुरती मर्यादित राहिलेली नाही. जगातील बहुतेक घडामोडींचे केंद्र हे अर्थकारणच आहे. त्यामुळे वाणिज्य क्षेत्रातील मनुष्यबळाची मागणी वाढली आहे. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्रोफेशनल बिझनेस अकौंटंट (पीबीए) अभ्यासक्रमाची साथ दिल्यास उत्कृष्ट करिअर घडू शकते, असे प्रतिपादन विश्व आयटॅप संस्थेचे संचालक व चार्टर्ड अकौंटंट पंकज मानधने यांनी केले.
राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनमध्ये शनिवारी ‘लोकमत युवा नेक्स्ट’ आणि ‘विश्व आयटॅप’ संस्थेतर्फे ‘कॉमर्स क्षेत्रात करिअरच्या संधी’ या विषयावर आयोजित सेमिनारमध्ये ते मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष व मार्व्हलस मेटल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सूरजित पवार, सी.ए. गिरीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मानधने म्हणाले, वाणिज्य क्षेत्रामध्ये नवनवीन बदल होत चालले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांकडे या क्षेत्रामधील नव्याने बदल करणाऱ्या व्यक्तींची मागणी जास्त आहे. विद्यार्थ्यांनी या विषयांचे संपूर्ण शिक्षण घेऊन यात करिअर करण्याची संधी चालून आली आहे. आज इंडस्ट्रीमध्ये पीबीए (प्रोफेशनल बिझनेस अकौंटंट)ची मागणी सतत वाढत आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून बिझनेस अकौंट्ंटससोबतच प्रत्येक व्यवसायासाठी लागणाºया सर्व कायद्यांचे शिक्षण घेऊन त्यात करिअर करणे म्हणजे ‘पीबीए’चे करिअर करणे होय. बी.कॉम.चा तीन वर्षांचा अमूल्य वेळ वाया घालविण्यापेक्षा या काळात ‘पीबीए’चे कोर्स केल्यास लगेचच चांगला जॉब व भविष्यातील सुरक्षित करिअर करता येते. दहा महिन्यांचा कालावधी आणि कोर्सदरम्यान मिळणारा जॉब यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो. लग्नानंतर अनेक महिलांच्या करिअरमध्ये गॅप पडतो. ‘पीबीए’चे कोर्स केल्याने आत्मविश्वास वाढून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता येते.
सी.ए. गिरीश कुलकर्णी म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये युनिक क्षमता आहे. ती ओळखून तिचा विकास करावा. एखादे ध्येय ठरविल्यानंतर ते गाठण्यासाठी प्रयत्न करावेत. तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल केल्यास नक्कीच यश मिळते.
सूरजित पवार म्हणाले, उद्योगक्षेत्रात कुशल कामगारांची कमतरता आहे. आपल्याकडील मुलांमध्ये क्षमता आहे. मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. वाणिज्य क्षेत्रामध्ये अनेक बदल होत आहेत. विद्यार्थ्यांनी ते स्वीकारण्याची मानसिकता ठेवावी.
दरम्यान, ‘आयटॉप’च्या माजी विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, या ठिकाणी आम्हाला टॅक्सेशन, जी.एस.टी. या विषयांचे खूप चांगले नॉलेज तज्ज्ञ सी.एं.च्या माध्यमातून मिळाले. त्यामुळे आम्हाला चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली आहे. याप्रसंगी कोल्हापूर ‘विश्व आयटॅप’चे संचालक रितेश मोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पालक-विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कमी वेळेत, कमी खर्चात होणार करिअर
मागील दहा वर्षे पुणे-मुंबईचे विद्यार्थी पीबीए करिअरचा फायदा घेऊन यशस्वी होत आहेत, हे लक्षात घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळावा, या उद्देशाने मागील वर्षापासून पीबीए हा उत्कृष्ट करिअर कोर्स ‘विश्व आयटॅप’च्या माध्यमातून कोल्हापुरात चालू केला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला आहे. इन्स्टिट्यूट आॅफ टॅक्सेशन अ‍ॅँड अकौंटिंग प्रोफेशनल्स (आयटॉप) या आयएसओ प्रमाणित शैक्षणिक संस्थेतून पी.बी.ए.चे करिअर घडविले जाते. अनुभवी चार्टर्ड अकौंटंट्सच्या वतीने ही सेवा ‘आयटॅप’ माध्यमातून सुरू केली आहे.
‘कॉमर्स पंडित एक्झाम’
या सेमिनारपूर्वी ‘कॉमर्स पंडित एक्झाम’ झाली. तिला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामध्ये कॉमर्स विषयावर आधारित ३० प्रश्न ३० मिनिटांत सोडविण्याची वेळ दिली होती. यामध्ये श्वेता दिलीप संकपाळने प्रथम, निशिगंधा रमेश जाधवने द्वितीय, तर हृषीकेश गवळीने तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

Web Title: 'PBA' excellent career in commerce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.