कोल्हापूरातील आर.टी.ओ.त वाहनांचे पासिंग ठप्प, पर्यायाची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 03:46 PM2017-11-01T15:46:22+5:302017-11-01T16:05:15+5:30

शासकिय जमिनीवरील ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध नसल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मालवाहतूक व प्रवासी वाहतुक वाहनांचे पासिंग उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले. त्यामुळे बुधवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात वाहने पांसिग करण्यासाठी थांबून राहीली.

Passing jam of vehicles in Roth of Kolhapur, option check | कोल्हापूरातील आर.टी.ओ.त वाहनांचे पासिंग ठप्प, पर्यायाची चाचपणी

कोल्हापूरातील आर.टी.ओ.त वाहनांचे पासिंग ठप्प, पर्यायाची चाचपणी

Next
ठळक मुद्देमोरेवाडीतील ब्रेक ट्रॅकचे काम आठवड्यात : पवारतूर्त कोल्हापूरातील वाहनांचे पिंपरी चिंचवड अथवा सोलापूरात पासिंगब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध नसल्यामुळे पासिंग बंदखासगी अथवा सार्वजनिक रस्त्यावर तपासणीस उच्च न्यायालयाच प्रतिबंध

कोल्हापूर ,दि. १ : शासकिय जमिनीवरील ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यातील मालवाहतूक व प्रवासी वाहतुक वाहनांचे पासिंग उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले. त्यामुळे बुधवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात वाहने पांसिग करण्यासाठी थांबून राहीली.

दरम्यान, जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे मोरेवाडी (ता. करवीर) येथील ट्रॅकचे काम वेळेत पूर्ण करता आले नाही, त्यासाठी किमान आठवडाभरचा कालावधी लागणार असल्याने पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यत जुन्याच ट्रॅकवर परवानगी द्यावी अशी मागणी परिवहन आयुक्तांमार्फत शासनाकडे करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

वाहनांची ब्रेक तपासणी व योग्यता प्रमाणपत्र शासकिय मालकीच्या जमिनीवरील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर घेणे आवश्यक आहे, खासगी अथवा सार्वजनिक रस्त्यावर तपासणीस उच्च न्यायालयाने प्रतिबंध केला आहे. पण नवीन वाहनांचे पासिंग करण्यात कोणत्याही प्रकारची अडचण नाही.


या ट्रॅक आणि कार्यालयासाठी मोरेवाडी येथील २० एकर जागेची प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मागणी केली होती. पण त्यापैकी अवघी १५ गुंठे जमीन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने आर.टी.ओ. कार्यालयाची बोळवण केली आहे.

या १५ गुंठे जागेत बे्रक टेस्ट ट्रॅक करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. पण परतीच्या पावसाने हे काम रखडले होते. त्यामुळे आता पाऊस थांबल्याने या ट्रॅकचे डांबरीकरणाचे काम हाती घेऊन ते आवठड्यात पूर्ण करणार आहे, ही बाबही वकीलामार्फत उच्च न्यायलायाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.


कोल्हापूरातील वाहनांचे पिंपरी चिंचवड अथवा सोलापूरात पासिंग

संपूर्ण राज्यात केवळ १४ शहरातच शासयिक जमिनीवर ट्रॅक उपलब्ध असल्याने तेथे वाहने तपासणीसाठी न्या, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी कळविले आहे. त्यामुळे या १४ शहरापैकी नजीकचे शहर म्हणजे पिपरी चिंचवड अथवा सोलापूर. पण कोल्हापूरातील वाहनांचे पासिंग करायचे असेल तर त्यांना सोलापूर अथवा पिंपरी चिंचवड गाठावे लागणार आहे. अन्यथा कारवाई टाळण्यासाठी वाहनधारकांनी पासिंग शुल्क भरणे आवश्यक आहे.
महिन्याभरात ७५ टक्के वाहनांचे पासिंग पूर्ण
उच्च न्यायालयाने प्रवासी व मालवाहतूक वाहनांचे पासिंग करण्यासाठी ३१ आॅक्टोबर ही अंतीम मुदत देण्यात आली होती. या मुदतीपर्यत मोरेवाडी येथील ट्रॅकचे काम पूर्ण होणार नसल्याने ऐन साखर कारखान्याच्या गळीत हंगामात वाहने पासिंगचा खोळंबा होऊ नये म्हणून जास्तीत-जास्त अधिकाºयामार्फत जास्तीत जास्त वाहने गेल्या महिन्याभरात पासिंग करण्यातआली. त्याबाबत कोल्हापूर जिल्हा लॉरी असोसिंएशनने प्रादेशिक परिवहन अधिकाºयांना विनंती केली होती. त्यानुसार शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही वेगवेगळी पथके तयार करुन अधिकाºयांनी कसबा बावडा मार्गावर जास्तीत-जास्त वाहने पासिंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ७५ ते ८० टक्के वाहनांचे पासिंग पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात २३ साखर कारखाने असून एकूण ५५०० ट्रकचे तर ३००० हून अधिक ट्रॅक्टरचे पासिंग पूर्ण केले आहे. त्यामुळे अधिकाºयांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे येत्या आठवडयात मोरेवाडीतील ब्रेक टेस्ट ट्रॅक पूर्ण करुन पासिंगसाठी वाहनधारकांची होणारी कोंडी थांबवावी असे आवाहन जिल्हा लॉरी आपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी केले आहे.
-------------
फोटो मिळाल्यास पाठवत आहे...
---------------
तानाजी पोवार

Web Title: Passing jam of vehicles in Roth of Kolhapur, option check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.