‘लोकमत’ बाल विकास मंच टॅलेंट शोमध्ये बहारदार सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 02:51 PM2019-04-26T14:51:48+5:302019-04-26T14:53:55+5:30

गाणी, नृत्य, अभिनय यांसारख्या विविध कलांचे बहारदार सादरीकरण झालेल्या ‘टॅलेंट शो’ने उपस्थित रसिकांची मने जिंकली. ‘लोकमत बाल विकास मंच’ व मार्क अप इंटरनॅशनल यांच्यातर्फे या शोचे आयोजन करण्यात आले.

Outstanding Presentation at 'Lokmat' Child Development Forum Talent Show | ‘लोकमत’ बाल विकास मंच टॅलेंट शोमध्ये बहारदार सादरीकरण

‘लोकमत’ बाल विकास मंच टॅलेंट शोमध्ये बहारदार सादरीकरण

Next
ठळक मुद्दे‘लोकमत’ बाल विकास मंच टॅलेंट शोबहारदार सादरीकरणाने जिंकली मने...

कोल्हापूर : गाणी, नृत्य, अभिनय यांसारख्या विविध कलांचे बहारदार सादरीकरण झालेल्या ‘टॅलेंट शो’ने उपस्थित रसिकांची मने जिंकली. ‘लोकमत बाल विकास मंच’ व मार्क अप इंटरनॅशनल यांच्यातर्फे या शोचे आयोजन करण्यात आले.

शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमाला स्पर्धक, रसिकांचीही चांगलीच गर्दी झाली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, मार्क अप इंटरनॅशनलचे संचालक अमित पाटील, संचालक निलांबरी शेलार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमासाठी पार्टनर म्हणून ‘ट्रू बॉडी वेलनेस स्टेपअप डान्स अकॅडमी’ यांचे सहकार्य मिळाले आहे.

लहान मुलांमधील आत्मविश्वास वाढविणे, त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी या शोचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी तीन दिवस आॅडिशन घेण्यात आली. यामधून निवडक बालकांना ‘टॅलेंट शो’साठी संधी देण्यात आली. या ‘टॅलेंट शो’मध्ये विद्यार्थ्यांनी दोन मिनिटांमध्ये अ‍ॅक्ट, नृत्य, मिमिक्री, गायन, क्लासिकल डान्स, गिटारवादन यांसारख्या कलागुणांचे सादरीकरण केले.

प्रत्येक स्पर्धकाने सादर केलेल्या परफॉर्मन्सला उपस्थितांकडून चांगलीच दाद मिळत होती. परीक्षक म्हणून मार्क अप इंटरनॅशनलचे संचालक अमित पाटील, निलांबरी शेलार यांनी काम पाहिले. यावेळी आपली कला सादर करून आत्मविश्वास वाढल्याची भावना अनेक स्पर्धकांनी व्यक्त केली.

बाल विकास मंच विजेते
शिवम मगदूम (प्रथम), समीक्षा लाड (द्वितीय), शुभाली म्हैंदरकर (तृतीय). उत्तेजनार्थ : अथर्व बिडकर, श्री दिवाण.

मार्क अप इंटरनॅशनल

दोन ते चार वर्षे अनुक्रमे निकाल असा : अधिराज अथणी, किरण शिंपुकडे, विहा गर्ग. पाच वर्षा : सूर्या पोवार, वर्षिका पवार, नारायणी जप्तनमुलखा. सहा वर्षे : सार्वी खरे, गतिग्यान शेलार, सात ते नऊ वर्षे : स्वरा दुधाणे, स्वागत गायकवाड, उन्नती पटेल. १० ते १३ वयोगट : सानवी बासराणी, कबीर घाटगोळकर, हरिप्रिया सावंत, सिमरन नंदवाणी.

उद्या फॅशन शो

मार्क अप इंटरनॅशनलच्या वतीने शनिवारी डी. वाय. पी. सिटी येथे सायंकाळी ६ वा. शायनी सुपर स्टार या ‘फॅशन शो’ चे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरातील बालकांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापुरात प्रथमच अशा प्रकारचा ‘फॅशन शो’ होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत खुला आहे. तरी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

बहारदार सादरीकरणाने जिंकली मने...

‘लोकमत’ बाल विकास मंच टॅलेंट शोचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गाणी, नृत्य, अभिनय यांसारख्या विविध कलांचे बहारदार सादरीकरण झालेल्या ‘टॅलेंट शो’ने उपस्थित रसिकांची मने जिंकली. ‘लोकमत बाल विकास मंच’ व मार्क अप इंटरनॅशनल यांच्यातर्फे या शोचे आयोजन करण्यात आले.
शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमाला स्पर्धक, रसिकांचीही चांगलीच गर्दी झाली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, मार्क अप इंटरनॅशनलचे संचालक अमित पाटील, संचालक निलांबरी शेलार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमासाठी पार्टनर म्हणून ‘ट्रू बॉडी वेलनेस स्टेपअप डान्स अकॅडमी’ यांचे सहकार्य मिळाले आहे.
लहान मुलांमधील आत्मविश्वास वाढविणे, त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी या शोचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी तीन दिवस आॅडिशन घेण्यात आली. यामधून निवडक बालकांना ‘टॅलेंट शो’साठी संधी देण्यात आली. या ‘टॅलेंट शो’मध्ये विद्यार्थ्यांनी दोन मिनिटांमध्ये अ‍ॅक्ट, नृत्य, मिमिक्री, गायन, क्लासिकल डान्स, गिटारवादन यांसारख्या कलागुणांचे सादरीकरण केले. प्रत्येक स्पर्धकाने सादर केलेल्या परफॉर्मन्सला उपस्थितांकडून चांगलीच दाद मिळत होती. परीक्षक म्हणून मार्क अप इंटरनॅशनलचे संचालक अमित पाटील, निलांबरी शेलार यांनी काम पाहिले. यावेळी आपली कला सादर करून आत्मविश्वास वाढल्याची भावना अनेक स्पर्धकांनी व्यक्त केली.
--------------------
बाल विकास मंच विजेते
शिवम मगदूम (प्रथम), समीक्षा लाड (द्वितीय), शुभाली म्हैंदरकर (तृतीय). उत्तेजनार्थ : अथर्व बिडकर, श्री दिवाण.
-------------------------
मार्क अप इंटरनॅशनल
दोन ते चार वर्षे अनुक्रमे निकाल असा : अधिराज अथणी, किरण शिंपुकडे, विहा गर्ग. पाच वर्षा : सूर्या पोवार, वर्षिका पवार, नारायणी जप्तनमुलखा. सहा वर्षे : सार्वी खरे, गतिग्यान शेलार, सात ते नऊ वर्षे : स्वरा दुधाणे, स्वागत गायकवाड, उन्नती पटेल. १० ते १३ वयोगट : सानवी बासराणी, कबीर घाटगोळकर, हरिप्रिया सावंत, सिमरन नंदवाणी.
-------------------------
लोकमत बाल विकास मंच लोगो वापरणे
---------------------
उद्या फॅशन शो
मार्क अप इंटरनॅशनलच्या वतीने शनिवारी डी. वाय. पी. सिटी येथे सायंकाळी ६ वा. शायनी सुपर स्टार या ‘फॅशन शो’ चे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरातील बालकांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापुरात प्रथमच अशा प्रकारचा ‘फॅशन शो’ होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत खुला आहे. तरी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
---------------------------------
२५०४२०१९ - कोल- लोकमत
फोटो ओळी : शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी ‘लोकमत बाल विकास मंच’ व मार्क अप इंटरनॅशनलतर्फे आयोजित ‘टॅलेंट शो’ मधील विजेत्यांसोबत अमित पाटील, निलांबरी शेलार.

Web Title: Outstanding Presentation at 'Lokmat' Child Development Forum Talent Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.