५० लाखांची गॅरंटी भरण्याचा कोल्हापूर पालिकेला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 09:35 PM2019-03-13T21:35:50+5:302019-03-13T21:38:03+5:30

शहरातील रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात मार्गदर्शक सूचनांची पूर्तता केल्यासंबंधीचा अहवाल वेळेत सादर केला नाही म्हणून बुधवारी राष्ट्रीय हरित लवादाने कोल्हापूर

Order of Kolhapur Municipal Corporation to pay a guarantee of 50 lakhs | ५० लाखांची गॅरंटी भरण्याचा कोल्हापूर पालिकेला आदेश

५० लाखांची गॅरंटी भरण्याचा कोल्हापूर पालिकेला आदेश

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय हरित लवादाची कारवाई : अहवाल सादर केला नसल्याने ५ लाखांचा दंड

कोल्हापूर : शहरातील रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात मार्गदर्शक सूचनांची पूर्तता केल्यासंबंधीचा अहवाल वेळेत सादर केला नाही म्हणून बुधवारी राष्ट्रीय हरित लवादाने कोल्हापूर महानगरपालिका तसेच महाराष्ट राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळास प्रत्येकी पाच लाखांचा दंड तसेच महानगरपालिकेला पन्नास लाखांची परफॉर्मन्स गॅरंटी (कामगिरीची हमी) भरण्याचा आदेश दिला. दंडाची तसेच परफॉर्मन्स गॅरंटीची रक्कम केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे भरावी लागणार आहे.

दिल्लीतील राष्ट्रीय हरित लवादाच्या चार न्यायाधीशांसमोर बुधवारी पुणे येथून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली. त्यावेळी लवादाने ही कारवाई केली. गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी महानगरपालिका तसेच महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाने लवादाने केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार कामगिरीचा अहवाल मुदतीत सादर केला नव्हता.

त्यामुळे लवादाने महानगरपालिका व महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना पंधरा दिवसांच्या आत प्रत्येकी पाच लाख रुपये दंड तसेच महापालिका प्रशासनास ५० लाखाची परफॉर्मन्स गॅरंटी भरण्याचे आदेश दिले.
मार्गदर्शक सूचनेकडे दुर्लक्ष करणे पडले महागात रंकाळा तलाव प्रदूषणासंदर्भात महानगरपालिकेच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादासमोर येथील कार्यकर्ते सुनील केंबळे यांनी खटला दाखल केला आहे. या खटल्यात पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दाही लवादाने समाविष्ट करून घेतला आहे.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान लवादाने काही मार्गदर्शक सूचना महापालिका प्रशासन व प्रदूषण नियंत्रण महामंडळाला केल्या आहेत तसेच प्रत्येक महिन्याला प्रदूषण रोखण्याबाबतच्या उपाययोजनांची माहिती लवादाला द्यायचे बंधन घातले आहे तरीही महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या कामगिरीचा अहवाल लवादासमोर वेळेत सादर केला नाही. ही बाब तशी गंभीर आहे.

Web Title: Order of Kolhapur Municipal Corporation to pay a guarantee of 50 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.