मोकाट घोड्याच्या धडकेत एकजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 04:58 PM2019-07-11T16:58:12+5:302019-07-11T17:00:49+5:30

रस्त्यावरून फिरणाऱ्या मोकाट घोड्याने जोरात धडक मारल्याने एकजण जखमी होण्याचा प्रकार कोथळी रोडवर (ता. करवीर) के. बी. पाटील सहकारी संस्थेसमोर घडला. यामध्ये रंगराव पांडुरंग पाटील (वय ५५ रा. कोथळी, ता. करवीर) हे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. १०) सायंकाळी घडली.

One injured in mishap clash | मोकाट घोड्याच्या धडकेत एकजण जखमी

मोकाट घोड्याच्या धडकेत एकजण जखमी

Next
ठळक मुद्देमोकाट घोड्याच्या धडकेत एकजण जखमीकोथळीतील प्रकार : घोडामालकावर गुन्हा

कोल्हापूर : रस्त्यावरून फिरणाऱ्या मोकाट घोड्याने जोरात धडक मारल्याने एकजण जखमी होण्याचा प्रकार कोथळी रोडवर (ता. करवीर) के. बी. पाटील सहकारी संस्थेसमोर घडला. यामध्ये रंगराव पांडुरंग पाटील (वय ५५ रा. कोथळी, ता. करवीर) हे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. १०) सायंकाळी घडली.

कोथळी (ता. करवीर) येथे रंगराव पाटील हे रस्त्यावर उभे होते. यावेळी फिरणाऱ्या मोकाट घोड्याने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये पाटील हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. त्यांना बेशुद्धावस्थेत गंगावेशमधील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.

याबाबत पाटील यांचा मुलगा पंकज रंगराव पाटील (वय २७) यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार घोड्याचे मालक उत्तम राघू येडके (रा. कोथळी) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 

 

Web Title: One injured in mishap clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.