अधिकाºयांनी जनतेच्या कामाला प्राधान्य द्यावे: आजरा पंचायत समिती सभेत रचना होलम यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 10:15 PM2017-11-20T22:15:03+5:302017-11-20T22:17:56+5:30

आजरा : कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी बाहेर असल्याचे आढळून आले आहे.

 Officials should give priority to the work of the people: Holaam's sign of creation at Azra Panchayat Samiti | अधिकाºयांनी जनतेच्या कामाला प्राधान्य द्यावे: आजरा पंचायत समिती सभेत रचना होलम यांचा इशारा

अधिकाºयांनी जनतेच्या कामाला प्राधान्य द्यावे: आजरा पंचायत समिती सभेत रचना होलम यांचा इशारा

Next
ठळक मुद्दे सभेतील ठराव : बेशिस्तपणा खपवून घेणार नाही तहसील कार्यालयात सक्षम अधिकाºयांच्या स्वाक्षरीने दाखले मिळावेत : शिरीष देसाई जि.प.च्या शाळा आजरा नगरपंचायतीकडे वर्ग करू नयेत.कॉ. संपत देसाई यांच्या धमकीपत्राचा निषेध जिल्हा नियोजन मंडळावर सभापतींना प्रतिनिधित्व मिळावे.

आजरा : कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी बाहेर असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कामासाठी आलेल्या लोकांची कुचंबणा होते, असा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नसून, अधिकाºयांनी जनतेच्या कामाला प्राधान्य देण्याची सूचना सभापती रचना होलम यांनी केली.

आजरा पंचायत समितीच्या मासिक सभेत त्या बोलत होत्या. सर्व अधिकारी व कर्मचाºयाची सोमवारी व शुक्रवारी उपस्थिती आवश्यक आहे. यावेळी टंचाई आराखडा, शाळा खोल्या यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी श्रमीक मुक्ती दलाचे राज्य संघटक कॉ. संपत देसाई यांना आलेल्या धमकीपत्राचा निषेध करण्याचा ठराव करण्यात आला. टंचाई आराखडा मुदतीत आराखडा सादर केला जात नाही.

यामुळे अनेक गावात टंचाई दूर करण्याची कामे होत नसल्याचे सदस्य उदय पोवार यांनी सांगितले. एसटीच्या मंजूर झालेल्या मुक्कामी गाड्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी उपसभापती गिरिषा देसाई यांनी केली. जिल्हा शिक्षणाधिकारी चौगुले यांनी शिक्षण विभागातील उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी सदस्य वर्षा कांबळे यांनी विविध सूचना मांडल्या. गटविकास अधिकारी एस. व्ही. केळकर यांनी प्रशासनाची बाजू मांडली. शिक्षण, कृषी, बांधकाम, आदी विषयांवर चर्चा करण्यात
आली.



 

Web Title:  Officials should give priority to the work of the people: Holaam's sign of creation at Azra Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.