विद्यार्थी संख्या ७५ हजाराने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:45 AM2017-12-25T00:45:47+5:302017-12-25T00:46:49+5:30

The number of students decreased by 75 thousand | विद्यार्थी संख्या ७५ हजाराने घटली

विद्यार्थी संख्या ७५ हजाराने घटली

Next

समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील शाळांच्या माध्यमातून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी केलेली हजारो उदाहरणे समोर असताना आता या जिल्हा परिषदांमधूनच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली आहे. बेसुमार पद्धतीने वाढणाºया खासगी शाळा, त्याला इंग्रजी माध्यमाची असलेली जोड आणि अशा शाळांकडे पाहिजे तेवढी फी देऊन मुलांना अशा शाळांमध्ये घालण्याकडे पालकांचा कल यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ही गळती लागल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
गेल्या १० वर्षांचा विचार करता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पहिली ते चौथी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये ७५७७८ नी घट झाली आहे. त्यामध्ये ४३५६३ मुलांचा तर ३२२१५ मुलींचा समावेश आहे. तालुकास्तरीय गावे आणि तालुक्यातील मोठ्या गावांच्या ठिकाणी अनेक खासगी शाळा, अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळा, स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरू झाल्याने साहजिकच पालकांचा ओढा अशा शाळांकडे वाढला आहे.
जिल्हा परिषदांच्या शाळांबाबत आणि तेथील अध्यापनाच्या दर्जाबाबतही सुशिक्षित पालकांमध्ये शंका उत्पन्न होत असल्याचे चित्र दिसत असून त्याचाच हा मोठा परिणाम मानला जातो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्याच मुलांचे २जर सर्वेक्षण केले तर अनेक शिक्षकांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकत नाहीत हे वास्तव आहे.
एकीकडे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आजरा, भुदरगड, राधानगरी तालुक्यातील विद्यार्थी राज्यात आपला दबदबा निर्माण करत असताना दुसरीकडे अन्य निमशहरी तालुक्यांना ही गुणवत्ता राखताना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांसाठी राबणूक करत असताना दुसरीकडे पाट्या टाकणाºया शिक्षकांचीही संख्या मोठी आहे. शासनाच्या बदलत्या धोरणांचाही परिणाम होत असल्याचेही चित्र जिल्'ात दिसून येते. दर आठ-दहा दिवसांनी शासनाचे वेगवेगळे येणार आदेश, माहितीचे संकलन करण्यात अडकलेले शिक्षक आणि शिक्षिका, अधिकारी बदलला किंवा सत्ता बदलली की बदलणाºया योजना याचा परिणाम शाळांवर होत असल्याचेही सांगण्यात येते.
विद्यार्थ्यांची झालेली घट तालुकानिहाय
तालुका ३० सप्टेंबर २००६ ३० सप्टेंबर २०१६ झालेली घट
आजरा १२००० ०७१७६ ०४८२४
गगनबावडा ०३४९० १०५१९ अधिक ७०२९
भुदरगड १५५५९ १४०५८ ०१५०१
चंदगड २०३८१ १०८९४ ९४८७
गडहिंग्लज १६७१४ ०३२९० १३४२४
हातकणंगले ३५२५८ २२४४१ १२८१७
कागल २२८७९ १६१२६ ०६१३१
करवीर ३८१११ २८५०८ ०९६०३
पन्हाळा २३०२७ १६८२३ ०६२०४
राधानगरी २००५९ १५०८१ ०४९७८
शाहूवाडी २१०१४ १५०२९ ०५९८५
शिरोळ २६९९१ १९१३८ ०७८५३
एकूण २५४८६१ १७९०८३ ७५७७८
गगनबावड्यात
उलट परिस्थिती
एकीकडे ११ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटत असताना गगनबावडा तालुक्यात मात्र याच्या नेमकी उलटी परिस्थिती दिसत आहे. या तालुक्यात दि. ३० सप्टेंबर २००६ मध्ये ३५४० विद्यार्थी या शाळांमध्ये शिकत होते तर सप्टेंबर २०१६ मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तब्बल १०५१९ विद्यार्थी शिकत आहेत म्हणजेच ७०२९ विद्यार्थी संख्या या शाळांमध्ये वाढली आहे. अतिशय दुर्गम भाग आणि छोटी, गावे, वाड्या, वस्त्या असल्याने येथे खासगी शाळा फारशा नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांशिवाय पर्याय नसल्याचे चित्र येथे दिसून येते.

Web Title: The number of students decreased by 75 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.