आता आमचं ठरलं...मदतीची परतफेड दक्षिणेत करू : मंडलिकप्रेमींची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:49 AM2019-05-31T11:49:53+5:302019-05-31T11:52:01+5:30

लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करण्यात तुम्ही केलेले सहकार्य कागलची जनता कधीही विसरणार नाही. आता आमचंबी ठरलंय.. तुमच्या मदतीची परतफेड दक्षिणेत करू, तुम्ही कधीही हाक द्या, अशी ग्वाही मंडलिकप्रेमी जनतेने आमदार सतेज पाटील यांना गुरुवारी येथे दिली.

Now it is ours ... Let us repay the help in the south: Guild of Friends | आता आमचं ठरलं...मदतीची परतफेड दक्षिणेत करू : मंडलिकप्रेमींची ग्वाही

लोकसभा निवडणुकीत विजयात सहकार्य केल्याबद्दल कागलच्या जनतेच्या वतीने मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या नेतृत्वाखालील मंडलिक प्रेमींनी गुरुवारी कोल्हापुरात आमदार सतेज पाटील यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

Next
ठळक मुद्देआता आमचं ठरलं...मदतीची परतफेड दक्षिणेत करूसतेज पाटील यांचा कागलच्या जनतेकडून सत्कार

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करण्यात तुम्ही केलेले सहकार्य कागलची जनता कधीही विसरणार नाही. आता आमचंबी ठरलंय.. तुमच्या मदतीची परतफेड दक्षिणेत करू, तुम्ही कधीही हाक द्या, अशी ग्वाही मंडलिकप्रेमी जनतेने आमदार सतेज पाटील यांना गुरुवारी येथे दिली.

मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या नेतृत्वाखाली सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे संचालक व विविध गावच्या सरपंचांसह शिष्टमंडळाने येथील हॉटेल सयाजीमध्ये आमदार पाटील यांचा सत्कार केला. कागलच्या जनतेच्या वतीने मंडलिक यांच्या विजयासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले.

शाल, पुष्पगुच्छ देऊन आपल्या भावना व्यक्त करताना जमादार यांनी कागलची जनता तुमच्या ऋणात राहील, तुम्ही कधीही बोलवा, आम्ही येऊ, असा विश्वास दिला. आमदार पाटील यांनीही आता दक्षिणेत तुमची आम्हाला मदत लागणार आहे, येथे जरा जास्त लक्ष घाला. विकासकामासाठी सहकार्य करा, असे आवाहन केले, याला प्रतिसाद देऊन जमादार यांच्यासह शिष्टमंडळानेही आम्ही स्वत: तुमच्या प्रचारात लक्ष घालू, असे आश्वासित केले.

जवळपास अर्धा तास चाललेल्या या आभार सोहळ्यात विजयाचा लेखाजोखा मांडतानाच भविष्यातील राजकीय सहकार्याच्या जोडण्या लावण्यात आल्या. शिष्टमंडळात मंडलिक कारखान्याचे उपाध्यक्ष बंडोपंत चौगले, संचालक मसू पाटील, आप्पासाहेब तांबेडकर, विश्वासराव कुराडे, कैलास जाधव, पंचायत समिती सदस्य राहुल महाडिक, प्रदीप चव्हाण, सरपंच विक्रम जाधव, दादा पाटील, शेखर सावंत, नंदू पाटील यांचा समावेश होता.

 

Web Title: Now it is ours ... Let us repay the help in the south: Guild of Friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.