‘नमामि पंचगंगा’ उपक्रमाच पुढचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 01:14 PM2018-09-18T13:14:05+5:302018-09-18T13:17:48+5:30

पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या अनेक प्रयत्नांमधील महत्वाचा उपक्रम म्हणून सुरू असलेल्या ‘नमामि पंचगंगा’ उपक्रमाने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी कार्यरत राहून पुढचे पाऊल टाकले आहे.

Next step of 'Namami Panchganga' | ‘नमामि पंचगंगा’ उपक्रमाच पुढचे पाऊल

‘नमामि पंचगंगा’ उपक्रमाच पुढचे पाऊल

Next

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या अनेक प्रयत्नांमधील महत्वाचा उपक्रम म्हणून सुरू असलेल्या ‘नमामि पंचगंगा’ उपक्रमाने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी कार्यरत राहून पुढचे पाऊल टाकले आहे.
आमदार अमल महाडिक आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून शहर आणि परिसरातील पंचगंगा घाट, रंकाळा, इराणी खण, कोटीतीर्थ तलाव, गांधीनगर, रूईकर कॉलनी उद्यान आणि राजाराम तलाव अशा सात ठिकाणी निर्माल्यदानासाठी ७५0 कार्यकर्ते सकाळी ९ वाजल्यापासून कार्यरत होते.

प्रत्येक घाटावर ‘निर्माल्य दानाचं पाऊल उचलूया, जलाशयांना समृध्द बनवुया’ असा संदेश देणारे फलक लावले होते. निर्माल्य दानाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आमदार महाडिक म्हणाले, ‘पर्यावरण संवर्धनाच्याबाबतीत नागरिकांनी विधायक पाऊल उचलले असून आमच्या ‘नमामि पंचगंगा’ उपक्रमाला पाठबळ देणारे आहे. सामान्य माणूस हाच चळवळीचा केंद्रबिंदू असल्याने त्यांच्या बळावर याहीपुढे प्रदूषणमुक्तीसाठी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. ’


आमदार अमल महाडिक आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखालील ‘नमामि पंचगंगा’ उपक्रमातंर्गत सात ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते.

 

 

Web Title: Next step of 'Namami Panchganga'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.