मुरगूड नगरपालिकेस ‘ओडिएफ प्लस’ मानांकन : स्वच्छ सर्वेक्षण अभियानाबाबत कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:15 AM2019-02-18T00:15:55+5:302019-02-18T00:16:25+5:30

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये मुरगूड नगरपरिषदेने उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल शासनाकडून पालिकेला ओडिएफ प्लस मानांकन प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यामुळे नगरपालिकेला शासनाकडून स्वच्छता व

Munigood Municipality 'ODIF Plus' rating: Appreciate the clean survey campaign | मुरगूड नगरपालिकेस ‘ओडिएफ प्लस’ मानांकन : स्वच्छ सर्वेक्षण अभियानाबाबत कौतुक

मुरगूड नगरपालिकेस ‘ओडिएफ प्लस’ मानांकन : स्वच्छ सर्वेक्षण अभियानाबाबत कौतुक

Next
ठळक मुद्देचाळीस लाखांचा मिळणार निधी

मुरगूड : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये मुरगूड नगरपरिषदेने उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल शासनाकडून पालिकेला ओडिएफ प्लस मानांकन प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यामुळे नगरपालिकेला शासनाकडून स्वच्छता व विकास कामासाठी सुमारे चाळीस लाखाचा निधी मिळणार आहे. भविष्यात ओडिएफ प्लस प्लस व सेव्हन स्टार मानांकन मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुरगूड शहर हागणदारीमुक्त झाल्याबद्दल शासनाकडून १ कोटीचे बक्षिस यापूर्वीच जाहीर झाले आहे. आता स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत हागणदारीमुक्त संदर्भात विशेष पथकाने दोन महिन्यांपूर्वी शहराची डिजिटल साधनांच्या माध्यमातून पाहणी केली होती. त्याचा अहवाल शासनास सादर केला होता. या सर्वेक्षण अभियानासाठी पालिका सर्व ताकदीनिशी सज्ज होती. त्यामुळेच या हा बहुमान मिळाला आहे.
नगरपालिकेने शहरात हायटेक सार्वजनिक शौचालये सुरु केली आहेत. या अंतर्गत पाण्याची व्यवस्था , कमोड, हँडवॉश, आरसे, लाईट, बेसिन आदी व्यवस्था केली आहे. या शौचालयाच्या आजूबाजूला स्वच्छताही ठेवली होती. याची दखल घेवून मुरगूडला हागणदारीमुक्तीबाबत ओडिएफ प्लस दर्जा मिळाला आहे.

या पुढे प्लस प्लस असा दर्जा मिळविण्याचा प्रयत्न पालिकेचा असल्याचे व याकामी प्रा. संजय मंडलिक, मुख्याधिकारी संजय गायकवाड, पदाधिकारी, सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाल्याचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेस उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, पक्ष प्रतोद जयसिंग भोसले, दीपक शिंदे, सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

मुरगूड (ता. कागल) येथे नगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी अशा पद्धतीने हायटेक शौचालये उभा केली आहेत. यामुळेच शासनाने ओडिएफ प्लस दर्जा दिला आहे.

Web Title: Munigood Municipality 'ODIF Plus' rating: Appreciate the clean survey campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.