सदाभाऊंवरील दगडफेकीचे पडसाद: इचलकरंजीत रयत क्रांतीची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 01:54 AM2018-02-25T01:54:54+5:302018-02-25T01:54:54+5:30

इचलकरंजी : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मोटारीवर माढा तालुक्यात झालेल्या दगडफेकीचे पडसाद शनिवारी जिल्ह्यात उमटले.

Massacre on Sadabhauj: The demonstrations of the Rai revolution in Ichalkaranji | सदाभाऊंवरील दगडफेकीचे पडसाद: इचलकरंजीत रयत क्रांतीची निदर्शने

सदाभाऊंवरील दगडफेकीचे पडसाद: इचलकरंजीत रयत क्रांतीची निदर्शने

googlenewsNext
ठळक मुद्देस्वाभिमानीच्या कार्यालयासमोर पोलीस-कार्यकर्त्यांत झटापट

इचलकरंजी : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मोटारीवर माढा तालुक्यात झालेल्या दगडफेकीचे पडसाद शनिवारी जिल्ह्यात उमटले. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इचलकरंजीत जुना सांगली नाका परिसरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये झटापट झाली.

रिधोरे बसस्थानकासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री खोत यांच्या मोटारीवर दगडफेक करत गाडीवर गाजर, मका, तूर फेकल्याची घटना घडली. ही माहिती समजताच येथील रयत क्रांती संघटनेने या घटनेचा निषेध केला. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. ही माहिती समजताच परिसरातील स्वाभिमानीचे कार्यकर्ते शहर कार्यालयासमोर जमू लागले. या घटनेमुळे वातावरण तणावपूर्ण बनल्याने रात्री बंदोबस्त ठेवला होता.

हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक करा :सुरेश पाटील
कोल्हापूर : ज्यांनी आयुष्यभर शेतकºयांच्या भल्याचा विचार केला, मंत्रिमंडळात सातत्याने शेतकºयांच्या हितासाठी आग्रह धरणाºया कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर भ्याड हल्ला करणाºयांनी हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक करावी, असे आव्हान रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिले. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी रयत क्रांती संघटनेच्या वतीने दसरा चौकात जोरदार निदर्शने करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निषेध केला.

यावेळी सुरेश पाटील म्हणाले, सदाभाऊ मंत्री झाल्यानंतरही शेतकºयांच्या हिताचेच निर्णय त्यांनी घेतले तरी केवळ द्वेषातून त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. ‘स्वाभिमानी’च्या नेत्यांमध्ये एवढी हिंमत असेल तर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची गाडी आडवून त्यांच्यावर दगडफेक करावी. लोकशाही मार्गाने टीकाटिप्पणी करणे आम्ही समजू शकतो; पण कायदा हातात घेऊन कोणी दंडुकशाहीची भाषा करीत असेल तर ते खपवून घेणार नसल्याचा इशारा पाटील यांनी दिला. यावेळी ‘स्वाभिमानी’च्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी परेश भोसले, संतोष कांदेकर, भारत तोडकर, शरद नारकर, रवी माने, राजेश हंकारे, रवी श्ािंदे, राजू सावंत उपस्थित होते.

उमळवाड येथे पुतळ्यांचे दहन
उदगाव : सदाभाऊ खोत यांना काळे झेंडे दाखवून गाडीवर दगडफेक केल्याच्या निषेधार्थ उमळवाड (ता. शिरोळ) येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांच्या पुतळ्याचे दहन केले. तर शेट्टी यांचा पुतळा जाळल्याचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्याचे दहन केले.
रयत क्रांती संघटनेचे राजू उपाध्ये, बंडू मिरजे यांच्या नेतृत्वाखाली शेट्टी यांच्या पुतळ्याचे दहन करत घोषणा देण्यात आल्या. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सिद्धार्थ मगदूम, वर्धमान भवरे, दानलिंग दनाने, वैभव भवरे, सुशांत चौधरी, किरण मगदूम, सुनील मगदूम, संदीप ठोंबरे, आदी कार्यकर्त्यांनी खोत यांचा निषेध करत त्यांचा पुतळा जाळला.

Web Title: Massacre on Sadabhauj: The demonstrations of the Rai revolution in Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.