मंडलिक यांनी ‘राजकीय वचन’ पाळले : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:37 AM2018-06-23T00:37:42+5:302018-06-23T00:38:34+5:30

सत्तेचे पद सोडताना दिलेला शब्द पाळण्याचे प्रकार अलीकडच्या राजकारणात दुर्मीळ होत चालले आहेत. या

Mandalik has followed the 'Political word': Hasan Mushrif | मंडलिक यांनी ‘राजकीय वचन’ पाळले : हसन मुश्रीफ

मंडलिक यांनी ‘राजकीय वचन’ पाळले : हसन मुश्रीफ

Next

कागल : सत्तेचे पद सोडताना दिलेला शब्द पाळण्याचे प्रकार अलीकडच्या राजकारणात दुर्मीळ होत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रा. संजय मंडलिकांनी कागल पंचायत समितीच्या सभापतिपदी आमच्या गटाला संधी देत ‘राजकीय वचन’ पाळले आहे. आमची सदस्य संख्या कमी होऊनही ते शब्दाला जागले आहेत. अशा शब्दांत आ. हसन मुश्रीफांनी प्रा. संजय मंडलिकांचे कौतुक केले.

कागल पंचायत समितीच्या नूतन सभापती-उपसभापती निवडीनंतर आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. मंडलिक साखर कारखान्याचे संचालक वीरेंद्र मंडलिक, जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने, जि. प. सदस्या शिल्पा खोत, नूतन सभापती राजश्री माने, उपसभापती विजयश्री भोसले, मावळते सभापती कमल पाटील, उपसभापती रमेश तोडकर यांच्यासह मंडलिक-मुश्रीफ गटाचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आम. मुश्रीफ आणि वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते नूतन, तसेच मावळते सभापती-उसभापती यांचा सत्कार करण्यात आला.

आम. मुश्रीफ म्हणाले, सव्वा वर्षापूर्वी जनतेने असा कौल दिला की, आम्हाला पंचायत समितीत एकत्रित सत्ता स्थापन करावी लागली. या सत्तेचा वापर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच केला जावा, अशी आमची अपेक्षा होती. ती सार्थ झाल्याचे वाटते. यावेळी वीरेंद्र मंडलिक म्हणाले की, नूतन पदाधिकाऱ्यांनी शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराने काम करावे. कै. सदाशिवराव मंडलिकांच्या विचारांना अभिप्रेत असे काम करावे. नूतन सभापती राजश्री माने, उपसभापती विजयसिंह भोसले यांचीही भाषणे झाली. स्वागत रमेश तोडकर यांनी, तर आभार राजेंद्र माने यांनी मानले.

मंडलिक गटाचा पहिला सभापती
आ. हसन मुश्रीफ म्हणाले, १९९७ साली पंचायत समिती पहिल्यांदाच मंडलिक गटाच्या ताब्यात आली आणि मला सभापतिपदाची संधी मिळाली. या संधीचा उपयोग जास्तीत जास्त सामान्य जनतेसाठी केला. पंचायत समिती सामान्य जनतेच्या दारी नेली.

मंडलिक-मुश्रीफ गटात एकोपा...
वीरेंद्र मंडलिक म्हणाले, पंचायत समितीच्या माध्यमातून खºया अर्थाने मंडलिक-मुश्रीफ गटात एकोपा निर्माण झाला आहे. सव्वा वर्षापूर्वी दोन्ही गटांचे सदस्य आपापल्या पक्षाचे ‘रंगाचे फेटे’ परिधान करून आले होते. आज एकत्रित पांढºया टोप्या परिधान करून हा एकोपा दाखविला आहे.

Web Title: Mandalik has followed the 'Political word': Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.