महाडिक यांचीच कसोटी लागण्याची चिन्हे-लोकसंपर्कात दोघेही मागे : मताधिक्य राखण्याचे मंडलिकांना आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 01:12 AM2019-03-16T01:12:04+5:302019-03-16T01:12:16+5:30

चं दगड विधानसभा मतदारसंघातून तब्बल १९ हजारांचे मताधिक्य घेतलेल्या शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्यासमोर यावेळी हे मताधिक्य अबाधित राखण्याचे आव्हान राहील. राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांना या ठिकाणी किमान मंडलिक यांच्याबरोबर राहण्यासाठी निकराचे प्रयत्न

Mahadik Signs Signs Of Troubles: Both are back in the Lok Sabha: Challenges | महाडिक यांचीच कसोटी लागण्याची चिन्हे-लोकसंपर्कात दोघेही मागे : मताधिक्य राखण्याचे मंडलिकांना आव्हान

महाडिक यांचीच कसोटी लागण्याची चिन्हे-लोकसंपर्कात दोघेही मागे : मताधिक्य राखण्याचे मंडलिकांना आव्हान

Next
ठळक मुद्देपरंतु, शरद पवार व महादेवराव महाडिक यांच्याशी असलेले ‘ऋणानुबंध’ लक्षात घेता ते ‘धनंजय’ यांना पाठिंबा शक्य आहे.

गडहिंग्लज-चंदगड
- राम मगदूम

चं दगड विधानसभा मतदारसंघातून तब्बल १९ हजारांचे मताधिक्य घेतलेल्या शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्यासमोर यावेळी हे मताधिक्य अबाधित राखण्याचे आव्हान राहील. राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांना या ठिकाणी किमान मंडलिक यांच्याबरोबर राहण्यासाठी निकराचे प्रयत्न करावे लागतील. म्हणूनच यावेळीही ‘चंदगड’मध्ये महाडिक यांचीच कसोटी आहे.
गडहिंग्लजमध्ये ‘राष्ट्रवादी’चा प्रभाव असला तरी चंदगडमध्ये राजेश पाटील गटाचे मजबूत पाठबळ, शिवसेनेचे गावागावांतील नेटवर्क आणि मुंबईशी असलेली कनेक्टिव्हिटी यांमुळे मंडलिक यांना गेल्या निवडणुकीत मताधिक्य मिळाले. या निवडणुकीतही त्यात फारसा बदल होणार नाही, असेच चित्र दिसते.
गतवेळी मोदी लाट आणि ज्येष्ठ नेते सदाशिवराव मंडलिक यांच्या व्यक्तिगत संबंधामुळेच प्रा. मंडलिक यांना या ठिकाणी महाडिक यांच्यापेक्षा १८ हजार ९४८ मते जास्त मिळाली होती. यावेळी ‘मोदी लाट’ आणि ‘वडिलांचे छत्र’ नसताना ते निवडणुकीला सामोरे जात आहेत; परंतु मागील पाच वर्षांत जिल्ह्णातील बदललेली राजकीय समीकरणे आणि ‘युतीची उमेदवारी’ यांमुळे त्यांचे पारडे सध्या जड दिसते. १९ हजारांचे मताधिक्य देणाऱ्या ‘चंदगड’करांना मंडलिकदेखील निवडणुकीनंतर भेटलेले नाहीत. त्यामुळे संपर्काबाबत दोघांबद्दलही कार्यकर्त्यांप्रमाणेच लोकांचीही नाराजी आहे. येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे जाळे आणि ‘गोकुळ’ची यंत्रणा ही महाडिक यांची जमेची बाजू असली तरी आमदार सतेज पाटील यांचा येथेही प्रभाव आहे. त्याचा फायदा मंडलिकांना होईल. आमदार संध्यादेवी कुपेकर व कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी विरोधी पक्षात असतानाही विकासकामांसाठी २०० कोटींचा निधी खेचून आणला आणि जपलेला कार्यकर्त्यांचा गोतावळा हीच राष्ट्रवादीची शक्ती आहे. या जोरावरच त्या पाहुणे महाडिकांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. गटा-तटांतील काँग्रेसची मते मिळविण्यासाठी महाडिक यांना झटावे लागेल.
‘चंदगड’चे राजकारण अजूनही पक्षीय पातळीवर आलेले नाही. त्यामुळेच नावापुरतेच ‘पक्षाचे लेबल’ वापरणारी ‘चंदगडी नेतेमंडळी’ नेहमीप्रमाणे यावेळीही सोईची भूमिका घेतील. राजेश नरसिंगराव पाटील आणि त्यांचे मामा भाजप नेते गोपाळराव पाटील यांना ‘मेहुण्या-पाहुण्यां’साठी म्हणून मंडलिक यांची पालखी खांद्यावर घ्यावी लागेल. शिवसेनेचे संग्रामसिंह कुपेकर, सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर आणि भाजपचे अशोक चराटी, रमेश रेडेकर, प्रकाश चव्हाण, हेमंत कोलेकर तर ‘सतेज प्रेमा’साठी सुरेशराव चव्हाण-पाटील व शिरोलीकर-देसाई मंडलिकांच्या पाठीशी राहतील. त्यामुळे केवळ ‘राष्ट्रवादी’ व ‘गोकुळची यंत्रणा’ आणि भरमूअण्णांच्या पाठिंब्यावरच महाडिक यांना अवलंबून राहावे लागेल.(उद्याच्या अंकात राधानगरी )

‘गडहिंग्लज’मध्ये राष्ट्रवादीबरोबरच हत्तरकी व अप्पी पाटील गट महाडिक यांच्यासोबत भक्कमपणे राहील. ज्येष्ठ नेते श्रीपतराव शिंदे यांचा कल अद्याप स्पष्ट झालेला नाही. परंतु, शरद पवार व महादेवराव महाडिक यांच्याशी असलेले ‘ऋणानुबंध’ लक्षात घेता ते ‘धनंजय’ यांना पाठिंबा शक्य आहे.

कोण कोणाच्या बरोबर राहणार ?
संजय मंडलिक - गोपाळराव पाटील, राजेश नरसिंगराव पाटील, अंजना रेडेकर, संग्रामसिंह कुपेकर, सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर, रमेश रेडेकर, अशोक चराटी, प्रकाश चव्हाण, हेमंत कोलेकर, सुरेशराव चव्हाण-पाटील, संभाजीराव देसाई-शिरोलीकर.
धनंजय महाडिक - संध्यादेवी कुपेकर, भरमूअण्णा पाटील, अप्पी पाटील, सदानंद हत्तरकी.

गत निवडणुकीतील मते
संजय मंडलिक : १,०१,७५३
धनंजय महाडिक : ८२,२०५
मताधिक्य : १८,९४८

 

Web Title: Mahadik Signs Signs Of Troubles: Both are back in the Lok Sabha: Challenges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.