Lok Sabha Election 2019 : विनय कोरेंची होणार कोंडी, ‘धनुष्यबाणा’चा करावा लागणार प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 04:25 PM2019-03-21T16:25:12+5:302019-03-21T16:28:49+5:30

ज्यांच्याविरोधात सहा महिन्यानंतर निवडणूक लढवायची आहे त्यांच्याच ‘धनुष्यबाण’ चिन्हाचा प्रचार करण्याची वेळ ‘जनसुराज्य’चे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे यांच्यावर येणार आहे. ही वेळ येऊ नये यासाठी कोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. मात्र ही शक्यता आता धूसर झाली आहे.

Lok Sabha Election 2019 Vinay Karaini will be held hostage, 'bows' | Lok Sabha Election 2019 : विनय कोरेंची होणार कोंडी, ‘धनुष्यबाणा’चा करावा लागणार प्रचार

Lok Sabha Election 2019 : विनय कोरेंची होणार कोंडी, ‘धनुष्यबाणा’चा करावा लागणार प्रचार

Next
ठळक मुद्देविनय कोरेंची होणार कोंडी, ‘धनुष्यबाणा’चा करावा लागणार प्रचारचंद्रकांत पाटील यांनी घेतली कोरे यांची भेट

कोल्हापूर : ज्यांच्याविरोधात सहा महिन्यानंतर निवडणूक लढवायची आहे त्यांच्याच ‘धनुष्यबाण’ चिन्हाचा प्रचार करण्याची वेळ ‘जनसुराज्य’चे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे यांच्यावर येणार आहे. ही वेळ येऊ नये यासाठी कोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. मात्र ही शक्यता आता धूसर झाली आहे.

पन्हाळा, शाहूवाडी मतदारसंघामध्ये गेली १0 वर्षे विनय कोरे आणि शिवसेनेचे सत्यजित पाटील यांच्यातील संघर्ष पहावयास मिळत आहे. जुन्या मतदारसंघातून एकदा आमदार झालेले सत्यजित पाटील यांचा कोरे यांनी २00९ च्या निवडणुकीत पराभव केला होता. तर त्याआधी २00४ मध्ये कोरे यांनी यशवंत एकनाथ पाटील यांचाही पराभव केला होता.

२00९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोरे यांनी बाजी मारत राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपदही पटकावले होते.
गेल्या विधानसभेला पराभूत झाल्यानंतर त्यांनी सत्तेत आलेल्या युतीपैकी भाजपशी जवळीक वाढवली आणि ते सत्तेसोबत राहिले आहेत. २00९च्या लोकसभा निवडणुकीवेळी कोरे यांनी राजू शेटटी यांना विरोध करत निवेदिता माने यांच्यामागे आपली ताकद लावली होती. तर २0१४ ला त्यांचा जनसुराज्य पक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या पाठीशी राहिला होता.

या लोकसभेला शेटटी यांच्याविरोधात सदाभाऊ खोत यांना उतरवण्याच्या हेतूने गेले वर्षभर हालचाली सुरू होत्या. याचाच एक भाग म्हणून खोत यांनी या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्याने दौरे लावत पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचा धडाका लावला.

सरलेला ऊस हंगाम सुरू होण्याआधी शेटटी यांच्या ऊस परिषदेच्या आधी वारणानगरजवळ खोत यांनी ऊस परिषद घेऊन त्यासाठी मुख्यमंत्र्यांसह तीन,चार मंत्री उपस्थित ठेवले होते. या सर्व घडामोडी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सुरू होत्या.

मात्र ही जागा शिवसेनेकडे असल्याने , तसेच उमेदवारीचा हेतू डोळ्यासमोर ठेवून धैर्यशील माने यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने या ठिकाणी पेच निर्माण झाला आहे. आपण आता जर धनुष्यबाणाचा प्रचार केला तर सहा महिन्यानंतर हाच ‘धनुष्यबाण’ सत्यजित पाटील यांच्या रूपाने आपल्या विरोधात उभारणार असल्याने कोरे अस्वस्थ झाले आहेत.

यातूनच त्यांनी फडणवीस, चंद्रकांत पाटील यांची भेट घेत सदाभाऊंचे नाव पुढे आणले आहे. यासाठी मुंबईत बैठकांवर बैठका झाल्या आहेत. त्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी धैर्यशील माने यांना ‘मातोश्री’वर बोलावून कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार बदलला जाणार का ?शिवसेना या ठिकाणी नमते घेणार का? तसे न झाल्यास कोरे ‘धनुष्यबाणा’चा प्रचार करणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

Web Title: Lok Sabha Election 2019 Vinay Karaini will be held hostage, 'bows'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.